लाँच होण्यापूर्वी मोटोरोला एज 30 फ्यूजनचे फीचर्स लीक, जाणून घ्या काय असेल खास

motorola edge 30 fusion features
motorola edge 30 fusion features
Updated on

मोटोरोला एज 30 फ्युजन (Motorola Edge 30 Fusion) 8 सप्टेंबर रोजी भारतात लॉन्च होण्याची शक्यता असून या फोनच्या अधिकृत लॉन्चपूर्वी, टिपस्टर योगेश ब्रार यांनी स्मार्टफोनची फीचर्स उघड केले आहेत. सांगितली आहेत, ज्यात बॅटरी, स्टोरेज वेरिएंट, प्रोसेसर यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. मोटोरोला या इव्हेंटमध्ये त्याचे प्रीमियम एज 30 अल्ट्रा आणि एज 2022 फोन देखील लाँच करेल अशी अपेक्षा आहे.

Motorola Edge 30 Fusion चे स्पेसिफिकेशन्स

टिपस्टरनुसार, Motorola Edge 30 मध्ये फुल-HD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.2-इंचाचा OLED डिस्प्ले असेल. तसेच या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट असेल, जे Moto G82 5G मध्ये देखील आढळते. तसेच टिपस्टरचा दावा आहे की Motorola Edge 30 Fusion मध्ये 6GB RAM आणि 128GB व्हेरिएंट आणि 8GB रॅम आणि 256GB व्हेरिएंट असतील. मोटोरोलाच्या चाहत्यांसाठी ही मोठी बातमी आहे कारण कंपनी सहसा फक्त 128GB पर्यंत स्टोरेज पर्याय ऑफर करते.

कॅमेऱ्यांबद्दल बोलायचे झाल्यास Motorola Edge 30 Fusion मध्ये OIS (ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन) आणि 13-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा असलेला 64-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर असेल. या फोनमध्ये 32-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. Motorola Edge 30 Fusion 33W टर्बो चार्जिंग आणि 4,020mAh बॅटरीसह येऊ शकतो.

motorola edge 30 fusion features
Twitter Edit Feature : युजर्ससाठी मोठी बातमी, आता ट्विट होणार एडिट!

Motorola Edge 30 Fusion ची किंमत

Motorola Edge 30 Fusion च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर हा फोन 25,000 ते 32,000 रुपयांच्या दरम्यान येऊ शकतो. सध्या, Motorola Edge 30 च्या बेस व्हेरिएंटची किंमत 27,999 रुपये आहे. त्याच्या 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे.

motorola edge 30 fusion features
Jio चे दमदार रीचार्ज प्लॅन, फ्री ओटीटी सबस्क्रिप्शन मिळेल 150GB डेटा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.