Motorola Mobile : Motorolaचा एकदम भारी मोबाईल फोन! खिशातल्या पाकिटापेक्षा लहान अन् हवा तसा होईल फोल्ड; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

Smartphone Update : 2000च्या दशकात Motorolaचा Razr फोन त्या काळात खूप लोकप्रिय होता. आता त्याच डिझाइनमध्ये पण अधिक फीचर्स सह फोल्डेबल फोन घेऊन येण्याची तयारी Motorola करत आहे
Motorola Flip Phone
Motorola Flip Phoneesakal

Motorola : आठवता काय 2000च्या दशकात हिट असलेला Motorolaचा Razr फोन? फ्लिप म्हणजे झुकणारा हा फोन त्या काळात खूप लोकप्रिय होता. आता त्याच डिझाइनमध्ये पण अधिक फीचर्स सह फोल्डेबल फोन घेऊन येण्याची तयारी Motorola करत आहे. Amazon वर लिस्ट झालेल्या या फोनमुळे भारतात लवकरच लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजून कंपनीने अधिकृत घोषणा केली नसली तरी काही खास गोष्टी समोर येऊ शकतात. या Motorola Razr 50 Ultra Flip फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर आणि 12GB रॅम असण्याची शक्यता आहे. (Motorola Foldable Mobile)

Motorola Flip Phone
AI Model Launch : चॅट जीपीटी आणि जेमिनीचे दिवस संपले? 'हे' नवीन AI मॉडेल देणार टक्कर,जाणून घ्या

कॅमेरा निर्मितीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ची मदत घेतलेली असू शकते. अडॅप्टिव्ह स्टॅबलायझेशन, ऍक्शन शॉट, इंटेलिजंट ऑटो-फोकस ट्रॅकिंग, फोटो एन्हांसमेंट प्रो, सुपर झूम अशा अनेक स्मार्ट फीचर्स या फोनमध्ये असू शकतात.

Motorola Flip Phone
Whatsapp Dialer : नंबर सेव्ह करण्याची गरज नाही, थेट करा कॉल; व्हॉटसअ‍ॅपचं नवं अपडेट आलंय; फिचर्स जाणून घ्या

हल्ली सगळीकडेच फोल्ड मोबाईलची क्रेझ दिसून येते. आकाराला अगदी छोटे आणि पोरटेबल असणारे हे मोबाईल सहनपणे कुणालाही आकर्षित करू शकतात. या फोल्डेबल फोनची किंमत मात्र किफायतशीर असेलच असे नाही.

अंदाजानुसार भारतात याची किंमत 1 लाख पेक्षा जास्त असू शकते. तरीही, फोल्डेबल फोन आणि त्यातही जुन्या Razr ची झलक असलेला हा फोन घेण्यासाठी काही लोक उत्सुक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com