Mr. Beast Vs T-Series : भारतातील प्रसिद्ध म्युझिक रेकॉर्ड लेबल आणि फिल्म प्रॉडक्शन कंपनी असलेल्या टी-सीरीजचे यूट्यूबवर सर्वाधिक सबस्क्राइबर्स आहेत. मात्र टी-सीरीजचं हे पहिलं स्थान आता धोक्यात आलं आहे. कारण मिस्टर बीस्ट (MrBeast) नावाचं चॅनल आता T-Series पासून केवळ 11 मिलियन सबस्क्राइबर्स दूर आहे. यामुळे टी-सीरीजने एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राइब करण्याचं आवाहन भारतीयांना केलं आहे.
टी-सीरीजचे यूट्यूबवर 263 मिलियन सबस्क्राइबर्स आहेत. जगातील सर्वाधिक सबस्क्राइबर्स असण्याचा रेकॉर्ड गेल्या कित्येक वर्षांपासून टी-सीरीजच्या नावे आहे. मात्र आता MrBeast या इन्फ्लुएन्सरचे सबस्क्राइबर्स हे 252 मिलियन झाले आहेत. म्हणजेच, केवळ 11 मिलियन सबस्क्राइबर्स मिळाल्यास मिस्टर बीस्ट हा टी-सीरीजला मागे टाकू शकतो.
यूट्यूब सबस्क्राइबर्सची ही लढाई टी-सीरीजने भारतीयांच्या अस्मितेची केली आहे. तुम्ही जर भारतीय असाल, तर 'टी-सीरीज'ला फॉलो करा असं आवाहन टी-सीरीज करत आहे. लेट्स युनाईट अँड क्रिएट हिस्ट्री नावाच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून हे आवाहन करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Mr. Beast Vs T-Series नावाचं एक खास हँडलही तयार करण्यात आलं आहे. याठिकाणी या दोन्ही चॅनलच्या लढाईबाबत अपडेट्स देण्यात येतात. या हँडलने टी-सीरीजच्या व्हिडिओबाबत माहिती दिल्यावर मिस्टर बीस्टने त्यावर प्रतिक्रिया दिली. यामध्ये त्याने केवळ दोन डोळे असणारा इमोजी वापरला आहे.
अशा प्रकारे सबस्क्राइबर्स गोळा करण्याची टी-सीरीजची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2019 साली टी-सीरीज आणि प्युडीपाय या यूट्यूबरमध्ये अशाच प्रकारची लढाई पहायला मिळाली होती. यावेळी देखील टी-सीरीजने भारतीय अस्मितेचा मुद्दा पुढे करत सबस्क्राइबर्स मिळवले होते. यावेळी प्युडीपायला टी-सीरीजने सहज मात दिली होती. सध्या प्युडीपायचे यूट्यूबवर 111 मिलियन सबस्क्राइबर्स आहेत.
या सगळ्यात काही नेटिझन्स टी-सीरीजचं समर्थन करताना दिसत आहेत. मात्र, कित्येकांनी टी-सीरीजला ट्रोल देखील केलं आहे. एखाद्या कंपनीचे सबस्क्राइबर्स वाढवणे हा देशाच्या अस्मितेचा मुद्दा कसा असू शकतो? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तसंच, "तुमची संपूर्ण कंपनी विरुद्ध एकटा व्यक्ती" अशी ही लढाई बरोबर नसल्याचंही कित्येक नेटिझन्स म्हणत आहेत. गेल्या वेळी देखील टी-सीरीजने प्युडीपाय या एकट्या व्यक्तीविरोधात आवाज उठवला होता. आता मिस्टर बीस्टच्या भीतीने टी-सीरीजने पुन्हा एकदा देशातील नागरिकांना हाक दिली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.