Top Youtuber : 'मिस्टर बीस्ट'ने टी-सीरिजला मागे टाकत रचला सबस्क्राइबर्सचा इतिहास; MrBeast विरुद्ध T-Seriesची स्टोरी माहितीये काय?

MrBeast : T-Series च्या 266 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स मिळवत बनला अव्वल युट्युबर
MrBeast Surpasses T-Series in Subscribers
MrBeast Surpasses T-Series in Subscribersesakal
Updated on

Youtube : यूट्यूबच्या सबस्क्रिप्शनच्या युद्धात मोठा धमाका झाला आहे! जिमी डोनाल्डसन, उर्फ MrBeast, हा यूट्यूबवर सर्वाधिक सबस्क्रिप्शन असलेला चॅनल बनला आहे. पण या युटूबरचा भारताशी देखील संबंध आहे. कारण एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Mr. Beast Vs T-Series नावाचं एक खास हँडलही तयार करण्यात आलं होतं.

याठिकाणी या दोन्ही चॅनलच्या लढाईबाबत अपडेट्स देण्यात येत होत्या. ही लढाई होती Subscribers ची. MrBeastने T-Series ला मागे टाकत हा विक्रम केला आहे.

MrBeast Surpasses T-Series in Subscribers
Truecaller Voice Assistant : तुमचे कॉल उचलणारा पर्सनल असिस्टंट आता मोबाईलमध्ये ; ट्रुकॉलरने आणलंय 'हे' नवीन फिचर

2023 च्या सुरुवातीलाच MrBeast ने स्वीडिश यूट्यूबर Pewdiepie ला मदत करण्याची घोषणा केली होती. आता त्यांनी हे लक्ष्य गाठले आहे. त्यांनी सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आणि त्यांचे सबस्क्रिप्शन T-Series पेक्षा जास्त असल्याचे स्क्रीनशॉट टाकले.

"सहा वर्षांनंतर आम्ही शेवटी Pewdiepie चा बदला घेतला आहे," असे MrBeast म्हणाले. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांना T-Series पेक्षा 266 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स दिसत आहेत.

जेन योशाई यांच्या मुलाखतीमध्ये MrBeast म्हणाले, "मला 'हे देश त्या देशाविरुद्ध' असे वाटले. फेलिक्सने (Pewdiepie) हे इतके टोकाला नेले नाही असे वाटते, पण सबस्क्रिप्शनच्या युद्धात थोडे वांशिक वादही झाले होते. म्हणून मी याकडे फार लक्ष देत नाही. मी फक्त सर्वाधिक सबस्क्रिप्शन असलेला चॅनल बनू इच्छितो. मला मदत करणारे अनेक लोक आहेत, पण शेवटी मी चॅनल सुरू केल. मी यासाठीच जगतो. मी एक क्रिएटर आहे."

MrBeast Surpasses T-Series in Subscribers
Whatsapp New Feature : व्हॉट्सअपने व्हॉइस स्टेटसचं फिचर केल अपग्रेड,आता वाढणार टाईम लिमिट

PewDiePie विरुद्ध T-Series काय वाद होता?

2019 साली टी-सीरीज आणि प्युडीपाय या यूट्यूबरमध्ये सबस्क्राइबर्ससाठी लढत पाहायला मिळाली होती.त्यावेळी T-Series ने या युट्युब चॅनेलला मागे टाकत जास्त सबस्क्राइबर्स मिळवले होते. सध्या प्युडीपायचे यूट्यूबवर 111 मिलियन सबस्क्राइबर्स आहेत.

पण आता MrBeastने T-Series पेक्षा जास्त सबस्क्राइबर्स मिळवल्यामुळे भारतीय कंपनीवर पुन्हा आपले स्थान अव्वल ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.