रिलायन्स जिओचे मालक मुकेश अंबानी यांनी स्वस्त दरात मोबाईल खरेदी करण्यासाठी गरिबांना सबसिडी देण्याची मागणी केली आहे.
रिलायन्स जिओचे (Reliance Jio) मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी स्वस्त दरात मोबाईल खरेदी करण्यासाठी गरिबांना सबसिडी देण्याची मागणी केली आहे. इंडिया मोबाईल कॉंग्रेस 2021 (India Mobile Congress 2021) मध्ये बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की, सरकारी युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंडाचा (Government Universal Service Obligation Fund) वापर देशात मोबाईल सबसिडी देण्यासाठी केला पाहिजे. मुकेश अंबानी यांचे मत आहे की, देशातील उपेक्षित लोकांना देशाच्या डिजिटल विकासाचा भाग बनवायचा असेल, तर त्यांना स्वस्त दरात सेवा आणि उपकरणे उपलब्ध करून दिली पाहिजेत.
मोबाईल इंडिया कॉंग्रेस 2021 इव्हेंट आजपासून म्हणजेच 8 डिसेंबर 2021 पासून सुरू झाला आहे. हा तीन दिवसीय कार्यक्रम 10 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. मोबाईल इंडिया कॉंग्रेस 2021 मध्ये टेलिकॉम मंत्र्यांसह दूरसंचार क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी होत आहेत.
मुकेश अंबानी म्हणाले की, देशात 5G आणणे ही जिओची पहिली प्राथमिकता आहे. 5G बद्दल बोलताना मुकेश अंबानी म्हणाले, आम्ही शंभर टक्के नेटिव्ह आणि सर्वसमावेशक 5G सोल्यूशन विकसित केले आहे जे पूर्णपणे क्लाउड नेटिव्ह, डिजिटल व्यवस्थापित आणि भारतीय आहे. आमच्या तंत्रज्ञानामुळे, जिओ नेटवर्क लवकरात लवकर 4G वरून 5G वर अपग्रेड केले जाऊ शकते. अंबानी देशातील सर्वांत मोठ्या तंत्रज्ञान कार्यक्रम, इंडिया मोबाइल कॉंग्रेस 2021 (IMC 2021) मध्ये बोलत होते.
मुकेश अंबानी म्हणाले की, भारताने लवकरात लवकर 2G वरून 4G आणि नंतर 5G कडे वळले पाहिजे. कोट्यवधी भारतीयांना सामाजिक- आर्थिक पिरॅमिडच्या तळाशी 2G पर्यंत मर्यादित ठेवल्यामुळे त्यांना डिजिटल क्रांतीच्या फायद्यांपासून वंचित ठेवले जात आहे. कारण कोविडमध्ये आपण पाहिले की जेव्हा सर्व काही बंद होते, तेव्हा फक्त इंटरनेट आणि मोबाईल आपल्यासोबत होते. तंत्रज्ञान हा आपल्या जीवनाचा आणि रोजगाराचा कणा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.