Mumbai Cyber Crime : युट्यूब व्हिडीओ पाहिले, लाईक केलं, अन् दीड कोटी हातचे घालवले; तुमच्यासोबतही हे घडू शकतं!

मुंबईतल्या या तरुणाला हा फटका बसला, त्याने २५ वेगवेगळ्या बँक अकाऊंट्समध्ये पैसे पाठवले आहेत.
cyber crime
cyber crimeesakal
Updated on

इंटरनेटमुळे आयुष्य सोपं तर झालंच आहे. पण त्यामुळे होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाणही वाढलं आहे. अनोळखी लोक, साईट्स यांच्यावर विश्वास ठेवल्याने मोठा आर्थिक, मानसिक फटका बसल्याची अनेक उदाहरणं आहेत. अशीच एक घटना मुंबईतल्या एका तरुणासोबत घडली आहे. युट्यूब व्हिडीओला लाईक केल्याने एका तरुणाने १.३ कोटी रुपये गमावले आहेत.

सायबर गुन्हेगाराने पीडित व्यक्तीला दररोज ५ ते ७ हजार रुपये मिळवून देण्याचं आमिष दाखवलं होतं. ४७ वर्षीय पीडित व्यक्ती एका मार्केटिंग कंपनीमध्ये काम करतो. सायबर गुन्हेगारांनी या व्यक्तीला युट्यूब व्हिडीओ पाहण्याचे आणि त्यांना लाईक करण्याचे पैसे देण्याचं आमिष दाखवलं आणि जानेवारी ते मार्च या महिन्यांमध्ये २५ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास सांगितलं.

cyber crime
Cyber Crime: 15 हजार रुपये फी भरून शिका सायबर क्राइम, आला 'नवीन जमतारा'

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीला व्हॉटसपवर एक मेसेज आला. यामध्ये पार्ट टाईम जॉबची ऑफर देण्यात आली होती. या जॉबमध्ये दररोज ५ ते ७ हजार रुपये कमवता येतील, असंही सांगितलं होतं. पीडित व्यक्तीशी चॅट करताना त्याला सांगण्यात आलं की, त्याला युट्यूब व्हिडीओ पाठवले जातील. त्याचं काम असेल की, त्याने हे व्हिडीओ पाहायचे, ते लाईक करायचे आणि त्याचे स्क्रिनशॉट व्हॉटसपवर पाठवायचे.

cyber crime
Cyber Crime: RBI ने फ्रीज केलेल्या खात्यातून बिल्डरचे 47,000 रुपये गायब; सायबर क्राईमची नवी पद्धत

पीडित व्यक्तीला त्यांनी नोंदणी फी म्हणून ५००० रुपये भरायला लावले. त्यानंतर त्याला युट्यूब व्हिडीओची लिंक पाठवण्यात आली आणि त्यात सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया करायला लावल्या. त्यानंतर १० हजार रुपयेही त्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले. पुढे त्याला एक टेलिग्राम चॅनेलही जॉईन करायला लावलं. त्याला ही रक्कम गुंतवणूक म्हणून भरायला सांगितली आणि काही कामं दिली. ही कामं झाल्यावर त्याला भरपूर पैसे मिळतील, असं आश्वासनही दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.

cyber crime
Pune Cyber Crime : एक क्लिक अन् पुण्यातल्या इंजिनियरने गमावले ५७ लाख रुपये; सायबर क्राईमची नवी पद्धत

त्यानंतर पीडित व्यक्तीने आपण गुंतवलेले पैसे परत मागितले. तेव्हा त्याला लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे. तेव्हा त्याला सांगण्यात आलं की, त्याने चांगलं काम केलं नाही, त्यामुळे त्यानेच पैसे द्यायला हवेत. तेव्हा पीडित व्यक्तीने पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()