Mobile Mushroom Chip : फक्त खाण्यासाठी नाही तर इलेक्ट्रॉनिक चिप बनवण्यासाठीही वापरलं जातं हे मशरूम

मशरूमच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही इंटरनेट वर बघितल्या असतील
Mobile Mushroom Chip
Mobile Mushroom Chip esakal
Updated on

Mobile Mushroom Chip : मशरूमच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही इंटरनेट वर बघितल्या असतील, त्याचे वेगवेगळे प्रकारही खाल्ले असतील; पण मशरूम पासून इलेक्ट्रॉनिक चिप्स बनवल्या जाणार आहेत हे काहीतरी नवीनच आहे.

Mobile Mushroom Chip
Mushroom Recipe: घरच्या घरी बनवा, टेस्टी मटर मशरूम मसाला

एकीकडे आपण टेक्निकल दुष्ट्या खूप प्रगती करतो आहोत तर दुसरीकडे हीच प्रगती इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या रूपाने जगाला हानी पोहोचवते आहे आणि यासगळ्यात मोठा वाटा हा इलेक्ट्रॉनिक चिप्स आणि बॅटरीचा आहे. या चिपला पॉलिमर चिप अस म्हणतात.

Mobile Mushroom Chip
National Mushroom Day : मशरूमची कॉफी प्यायलीय का? जाणून घ्या आणखी फायदे 

कारण त्या तयार करण्यासाठी प्लास्टिकचा वापर केला जातो पण त्याच रि युझ होत नाही, पण आता शास्त्रज्ञांना प्लॅस्टिक साठी पर्याय म्हणून मशरूम वापरला जाऊ शकतो असा शोध लागला आहे. मशरूमपासून चिप्स बनवल्या तर जगात दरवर्षी सुमारे 50 दशलक्ष टन इलेक्ट्रॉनिक कचरा कमी होईल आणि त्याचा परिणाम पर्यावरणावरही दिसून येईल.

Mobile Mushroom Chip
Shahi Mushroom Recipe: हॉटेल सारखी बनवा घरच्या घरी

मशरूम प्लॅस्टिकला पर्याय बनणार आहे

शास्त्रज्ञांच्या मते, चिप बनवण्यासाठी जी गुणवत्ता लागते ती कुजणाऱ्या झाडांवर उगवलेल्या मशरूमची गैनोडर्मा ल्युसिडम प्रजातीमध्ये आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक चिपमध्ये प्लास्टिकऐवजी त्याचा वापर होण्याच्या आशा वाढल्या आहेत.

Mobile Mushroom Chip
Jalgaon Crime Update : बसमध्ये चढताना Mobile चोरणाऱ्या चोरट्यास अटक

गैनोडर्मा मशरूमच्या वरच्या भागावर 200 अंश सेल्सिअस तापमान सहन करण्याची क्षमता आहे. जो आता प्लास्टिक पॉलिमरपासून बनवलेल्या चिपचा एक चांगला पर्याय बनू शकतो. प्लास्टिक पॉलिमर चिप खराब झाल्यावर फेकून दिली जाते.

Mobile Mushroom Chip
Mobile Technology : फोन हरवल्यावर लगेच मिळणार परत; फोन ऑफ झाल्यावरही मिळणार लाइव्ह लोकेशन

बॅटरी आणि ब्लूटूथ देखील काम करेल

गैनोडर्मा मशरूमचा वरचा भाग इतका मजबूत आहे की तो वर्षानुवर्षे तसाच राहू शकतो आणि ते वेगवेगळ्या उपकरणांमध्ये वापरल जाऊ शकत. चिप्स व्यतिरिक्त, याचा वापर सामान्य बॅटरी बनवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो आणि कमी पॉवरच्या ब्लूटूथ सेन्सरमध्ये देखील याचा वापर केला जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.