Chandrasekhar Elon Musk : 'माझ्या मुलाचं मधलं नाव चंद्रशेखर', इलॉन मस्कने दिली माहिती; केंद्रीय मंत्री झाले चकित

केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर हे सध्या यूकेमध्ये एआय सेफ्टी समिटला हजर आहेत.
Elon Musk Kid Middle Name
Elon Musk Kid Middle NameeSakal
Updated on

केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर हे सध्या यूकेमध्ये एआय सेफ्टी समिटला हजर आहेत. याठिकाणी त्यांनी एक्सचे (ट्विटर) मालक आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांची भेट घेतली. यावेळी आपल्या एका मुलाचं मधलं नाव देखील 'चंद्रशेखर' असल्याचं इलॉन मस्कने सांगितलं.

राजीव यांनी आपल्या एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली. त्यांनी इलॉन मस्कसोबतचा आपला फोटो देखील पोस्ट केला आहे. "इलॉन मस्क आणि शिव्हॉन झिलिस यांच्या मुलाचं मधलं नाव 'चंद्रशेखर' आहे. नोबेल पारितोषिक विजेते फिजिसिस्ट एस. चंद्रशेखर यांच्या नावावरुन हे ठेवण्यात आलं आहे." असं राजीव यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं.

झिलिस यांनीदेखील राजीव यांच्या पोस्टला रिप्लाय दिला आहे. "हे खरं आहे. आम्ही त्याला शॉर्टमध्ये शेखर असंही म्हणतो. मात्र त्याचं नाव हे सुब्रमण्यन चंद्रशेखर यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे." असं त्या म्हणाल्या. (Tech News)

एस. चंद्रशेखर

एस. चंद्रशेखर यांना 1983 साली फिजिक्स विषयातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. अ‍ॅस्ट्रोफिजिसिस्ट असणाऱ्या चंद्रशेखर यांनी ताऱ्यांच्या उत्पत्ती आणि उत्क्रांतीबाबत केलेल्या अभ्यासासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.

Elon Musk Kid Middle Name
Elon Musk Offer : 'नाव बदला, 1 बिलियन डॉलर्स देतो'; विकिपीडियानंतर आता इलॉन मस्कची फेसबुकला ऑफर!

एआय सेफ्टी मीट

ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी एआय सुरक्षा परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेला जगभरातील टेक जायंट्स आणि तंत्रज्ञान मंत्री उपस्थित आहेत. चंद्रशेखर यांनी या परिषदेमध्ये कित्येक नेत्यांसोबत बैठका पार पाडल्या आहेत. यामध्ये यूकेचे एआय अँड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मंत्री जॉनथन कॅमरोस आणि ऑस्ट्रेलियाचे इंडस्ट्री अँड सायन्स मंत्री एड ह्युसिक यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.