Aliens On Earth: पृथ्वीवर माणसांप्रमाणेच राहत आहेत 'सिक्रेट' एलियन्स; हार्वर्ड विद्यापीठाचे संशोधन कितपत खरे?

Harvard Research: वाळवंटात चमकणारा धातूचा मोठा स्तंभ आणि एलियन्स, खूप महत्वाचा संबंध
Mysterious Structure Appears in Las Vegas Desert After Alien Study
Mysterious Structure Appears in Las Vegas Desert After Alien Studyesakal
Updated on

Mysterious Monolith : लॉस वेगासच्या उत्तरेकडील वाळवंटात पुन्हा एक विचित्र आणि रहस्यमय घटना घडली आहे. वृत्तानुसार, या भागात चमकणारा धातूचा एक मोठा स्तंभ अचानक प्रकट झाला आहे. या स्तंभाची रचना काही वर्षांपूर्वी युटाहमध्ये आढळलेल्या स्तंभासारखीच आहे. लॉस वेगासच्या शोध आणि बचाव संघटनेने (Las Vegas Search & Rescue) गॅस पीक (Gass Peak) जवळील वाळवंटात हा स्तंभ शनिवार-रविवारच्या दिवशी शोधून काढला आहे.

यापूर्वी हॉर्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासातून असा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे की, बाह्यग्रहावरील लोक पृथ्वीवर राहतात, त्यांचे अस्तित्व गुप्त आहे. या अहवालानंतर लास वेगासमधील हा स्तंभ आढळणे योगायोग असू शकतो का यावर चर्चा सुरु झाली आहे.

हे सर्व काही वेल्सच्या सीमेवर असलेल्या टेकडीवर आढळलेल्या "UFO" सारख्या रहस्यमय स्तंभाच्या घटनेनंतर घडत आहे. मार्चमध्ये हाय ऑन-वाय (Hay-on-Wye) जवळील हे ब्लफ (Hay Bluff) पाहण्यासाठी गेलेल्या हायकर क्रेग म्युइर (Craig Muir) यांनी या चमकणाऱ्या स्तंभाचा व्हिडिओ शूट केला होता.

Mysterious Structure Appears in Las Vegas Desert After Alien Study
Mobile Hang Problem : मोबाईल सतत होतोय हँग? 'या' सोप्या ट्रिक्स वापरून तर बघा, स्मार्टफोन होईल सुपरफास्ट

हे जगातील पहिल्यांदा आढळलेले स्तंभ नाहीत. यापूर्वी बेल्जियम, रोमानिया आणि इंग्रिश चॅनलमधील आयल ऑफ वाइट (Isle of Wight) या ठिकाणी देखील असे स्तंभ आढळले आहेत. 18 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान जगभरात अशा 23 स्तंभांची नोंद झाली आहे.

2020 मध्ये युटाहच्या राज्य वन्यजीव कर्मचाऱ्यांना 10 ते 12 फूट उंची अशी स्तंभ रचना आढळली होती. साल्ट लेक सिटीच्या चॅनलशी बोलताना हेलिकॉप्टर चालक ब्रेट हचिंग्स (Bret Hutchings) यांनी सांगितले की, त्यांच्या आतापर्यंतच्या उड्डाण कारकीर्दीत हा सर्वात विचित्र अनुभव होता.

Mysterious Structure Appears in Las Vegas Desert After Alien Study
Charging Gadgets : पॉकेट फ्रेंडली पॉवर केबल मार्केटमध्ये; वजनाने एकदम हलकी; आणखी एक फिचर आहे खास,जाणून घ्या

ही रहस्यमय रचना कोणी आणि कशासाठी ठेवली याचा काहीही शोध लागला नाही, असे युटाहच्या जनसुरक्षा विभागाने (Utah Department of Public Safety) एका पत्रांद्वारे कळवले होते. या घटनेच्या एका आठवड्यानंतर आणखी एक स्तंभ लॉस एंजेलिसच्या उत्तरेकडील अटास्काडेरो (Atascadero), कॅलिफोर्निया येथे आढळला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()