Chandrayaan-3 : ऑस्ट्रेलियाच्या बीचवर आढळलेली 'ती' वस्तू इस्रोच्याच रॉकेटचा भाग; अखेर सत्य आलं समोर

ISRO PSLV Rocket : इस्रोच्या पीएसएलव्ही रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्यातील हा भाग आहे.
ISRO PSLV Rocket
ISRO PSLV RocketeSakal
Updated on

इस्रोने 14 जुलै रोजी चांद्रयान-3 यशस्वीपणे लाँच केलं होतं. यानंतर दोनच दिवसात ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर एक रहस्यमयी वस्तू आढळून आली होती. ही वस्तू म्हणजे चांद्रयानाच्या रॉकेटचा भाग असल्याचा अंदाज लावण्यात येत होता. मात्र आता यामागचं सत्य समोर आलं आहे.

ऑस्ट्रेलियाच्या 'ज्युरियन बे' या बीचवर ही वस्तू मिळाली होती. लाटांसोबत वाहत ही वस्तू किनाऱ्यावर आली होती. ही वस्तू इस्रोच्या पीएसएलव्ही रॉकेटचा भाग असल्याचं स्पष्ट झालं आहे. ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीने आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरुन याबाबत माहिती दिली.

चांद्रयानाशी काय संबंध?

ही वस्तू इस्रोच्या रॉकेटचाच भाग असल्याचं स्पष्ट झालं आहे. इस्रोच्या पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकलच्या (PSLV) तिसऱ्या टप्प्यातील हा एक भाग आहे. इस्रोच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे, की हा कदाचित त्या रॉकेटचा भाग असू शकतो ज्याच्या मदतीने दोन महिन्यांपूर्वी एक नेव्हिगेशन सॅटेलाईट लाँच करण्यात आला होता. हा उपग्रह दक्षिण दिशेला प्रक्षेपित करण्यात आला होता, त्यामुळे याच्या रॉकेटचा भाग ऑस्ट्रेलियाजवळ पडणं शक्य आहे. त्यामुळे चांद्रयानाशी याचा काही संबंध नसल्याचं म्हटलं जात आहे.

ISRO PSLV Rocket
ISRO Satellite Launch : इस्रोची आणखी एक मोठी कामगिरी! सिंगापूरच्या सात उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

इस्रोशी चर्चा सुरू

ऑस्ट्रेलियाच्या स्पेस एजन्सीने रॉकेटचा हा भाग सध्या त्यांच्याकडे ठेऊन घेतला आहे. याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या अंतराळ करारानुसार इस्रोशी चर्चा करून पुढील पावलं उचलण्यात येतील, असं एजन्सीने स्पष्ट केलं आहे. सोबतच, अशा आणखी रहस्यमयी वस्तू दिसून आल्यास नागरिकांनी त्वरीत प्रशासनाशी संपर्क साधून याबाबत माहिती द्यावी असं आवाहन देखील संस्थेने केलं आहे.

चांद्रयान-3 चंद्राकडे रवाना

दरम्यान, चांद्रयान-3 अगदी निर्धारित गतीने आणि सुरक्षितपणे चंद्राच्या दिशेने प्रवास करत आहे. 5 ऑगस्टपर्यंत ते चंद्राच्या कक्षेत पोहोचेल. त्यानंतर चंद्राभोवती काही फेऱ्या मारल्यानंतर 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी ते चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करेल. (Chandrayaan 3 Update)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.