Lunar Mystery : चंद्रावरच्या 'त्या' खंडकांचं रहस्य उलघडलं! शास्त्रज्ञांचा आश्चर्यकारक खुलासा

Moon Swirls : चंद्राच्या पृष्ठभागावर दिसणारे आकर्षक आणि गूढ स्वरुपाचे वलय (Lunar Swirls) वैज्ञानिकांना अनेक वर्षांपासून गोंधळात टाकत होते.
Lunar Swirls and Magnetic Mysteries
Lunar Swirls and Magnetic Mysteriesesakal
Updated on

Magnetic Discovery : चंद्राच्या पृष्ठभागावर दिसणारे आकर्षक आणि गूढ स्वरुपाचे वलय (Lunar Swirls) वैज्ञानिकांना अनेक वर्षांपासून गोंधळात टाकत होते. हे वलय अनेक किलोमीटरच्या अंतरापर्यंत विस्तारलेले असून दूरवरवरूनही दिसतात. नुकत्याच झालेल्या संशोधनामुळे या चंद्रावरील आश्चर्यकारक आकृतिबंधामागील रहस्य उलगडण्यास मदत मिळाली आहे.

नासाच्या छायाचित्रांवरून हे वलय केवळ कलात्मक आकृतिबंध नसून चुंबकीय विसंगतीशी (Magnetic Anomalies) संबंधित असल्याचे दिसून आले आहे. या वलयामधील खडकांचे चुंबकीकरण झाले असून ते सूर्यापासून येणाऱ्या किरणांपासून चंद्राचे संरक्षण करतात. त्यामुळे हे वलय उजळ दिसतात, तर जवळील खडक मात्र सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या रासायनिक प्रतिक्रियांमुळे गडद होतात.

या खडकांच्या चुंबकीकरणाचे मूळ हे काय आहे यावरून मात्र वादविवाद आहेत. चंद्रावर सध्या जागतिक चुंबकीय क्षेत्र नाही. त्यामुळे या खडकांचे चुंबकीकरण कसे झाले हे अस्पष्ट आहे. वॉशिंग्टन विद्यापीठातील सह- प्राध्यापक मायकल जे. क्रॉब्झिन्स्की यांच्या मते उल्कापातांमुळे स्थानिक चुंबकीय विसंगती निर्माण होऊ शकतात. परंतु, काही वलय आकार आणि आकारमानांना केवळ उल्कापातांमुळे स्पष्टीकरण करता येत नाही असे ते नमूद करतात.

Lunar Swirls and Magnetic Mysteries
Asteroid Alert: पृथ्वी नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी भारत बजावणार महत्वाची भूमिका, ISRO चीफ सोमनाथ काय म्हणाले?

क्रॉब्झिन्स्की यांनी पर्यायी सिद्धांत मांडला आहे ज्यामध्ये जमिनीच्या आतून वाहणारा लावा चुंबकीय क्षेत्रात थंड झाल्यावर हे विसंगती निर्माण होऊ शकतात. त्यांच्या प्रयोगांमध्ये चंद्रावर मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या इल्मेनाइट या खनिजावर वेगवेगळ्या वातावरणीय रचनांचा आणि लावा थंड होण्याच्या वेगवेगळ्या गतीचा परिणाम तपासण्यात आला. या संशोधनानुसार चंद्राच्या वातावरणात इल्मेनाइट चुंबकीकरण होऊ शकणारे लोह कण तयार करू शकतो, विशेषत: पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाच्या मानाने जास्त असलेल्या लहान कणांमध्ये.

Lunar Swirls and Magnetic Mysteries
ISRO Chief : सुनीता विल्यम्स अंतराळात अडकल्याने जगाला चिंता, पण इस्रो प्रमुखांनी दिली खुशखबर; नेमकं काय म्हणाले?

हे संशोधन चंद्राच्या पृष्ठभागावरील प्रक्रिया आणि त्याच्या चुंबकीय इतिहासाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. भविष्यातील मोहिमांमध्ये जसे की नासाची 2025 ची रिनेर गामा येथील लुनर व्हर्टेक्स मोहीम, या चुंबकीय विसंगतींचा अधिक सखोलपणे अभ्यास करण्याचे लक्ष्य आहे.

या सिद्धांतांची पुष्टी करण्यासाठी सध्या चंद्रावर खड्डा निर्माण करणे शक्य नाही. परंतु क्रॉब्झिन्स्की यांचा प्रयोगशील दृष्टिकोन चंद्राच्या या रहस्यात्मक वलय निर्मितीमध्ये द्रव लावाच्या भूमिकेबद्दलच्या अंदाजांची चाचणी घेण्यासाठी आशादायक पद्धत ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.