NASA Warning : आज पृथ्वीला धडकणार विशाल सौरवादळ; नासाने दिला गंभीर इशारा

Solar Storm : 24 डिसेंबरला रात्री सूर्याच्या पृष्ठभागावर एक कोरोनल मास इंजेक्शन (CME) म्हणजेच मोठा स्फोट झाला. हा स्फोट त्या भागावर झाला, जो पृथ्वीच्या बाजूला आहे.
Solar Storm Today
Solar Storm TodayeSakal
Updated on

NASA Warns of Solar Storm :

ख्रिसमसच्या दिवशी सूर्यावर झालेल्या स्फोटांमुळे एक विशाल सौरवादळ पृथ्वीच्या दिशेने येत आहे. आज (27 डिसेंबर) ते वादळ पृथ्वीला धडकू शकते असा इशारा अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासाने दिला आहे. यामुळे काही ठिकाणी वीज जाण्याचा, तसंच मोबाईल नेटवर्क जाण्याचा धोका असल्याचं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.

24 डिसेंबरला रात्री सूर्याच्या पृष्ठभागावर एक कोरोनल मास इंजेक्शन (CME) म्हणजेच मोठा स्फोट झाला. हा स्फोट त्या भागावर झाला, जो पृथ्वीच्या बाजूला आहे. यानंतर कित्येक मॅगनेटिक वेव्ह्ज पृथ्वीच्या दिशेने येऊ लागल्या. यामुळे पृथ्वीवर आज जिओमॅन्गेटिक वादळं येण्याची शक्यता आहे. (NASA Alert)

काय होणार परिणाम?

वेदर चॅनलने दिलेल्या रिपोर्टनुसार, या सौर वादळांचा (Solar Storm Impact) सर्वात मोठा फटका हा सॅटेलाईट्सना बसू शकतो. यासोबतच पृथ्वीच्या उत्तरेकडे असणाऱ्या भागात याचा फटका बसेल. पृथ्वीच्या मॅगनेटिक फील्डमधून या वेव्ह्ज गेल्यास पृथ्वीवर G1 स्तराचे जिओमॅग्नेटिक वादळ (Geomagnetic Storm) निर्माण होऊ शकते. G1 हे सर्वात सौम्य प्रकारचं वादळ असतं.

Solar Storm Today
NISAR : दर 12 दिवसांनी अपडेट होणार जगाचा नकाशा, इस्रो अन् नासा लाँच करणार 'निसार'; नव्या वर्षात उड्डाण

उत्तर भागातील उंचीवर असणाऱ्या भागातून या वादळामुळे नॉर्दन लाईट्स (Auroras) देखील पहायला मिळू शकतात असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हे वादळ पृथ्वीला धडकण्याची शक्यता ही 50-50 असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. (NASA Solar Storm Alert)

कशामुळे येतात सौर वादळे?

सूर्याच्या पृष्ठभागावर सतत मोठे-मोठे स्फोट होत असतात. अशा वेळी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात सोलर फ्लेअर्स, यूव्ही किरणं, क्ष किरणं आणि गामा रेज बाहेर पडतात. G1 स्तराची सौरवादळे ही सर्वात सौम्य तर G5 स्तराची सौरवादळे सर्वात गंभीर असतात.

Solar Storm Today
Aditya L1: सूर्य मोहिमेची मोठी कामगिरी! पहिल्यांदाच सूर्याची जवळून टिपली छायाचित्रे; मोहिमेचं पुण्याशी खास कनेक्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.