NASA Mission: सुनीता विलियम्स अजून परतल्या नाही, तोवर नासा अंतराळात पाठवतंय 4 अंतराळवीर,काय आहे मोहीम?

Sunita Williams Update : नासा ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर म्हणजेच आयआयएस वर 4 अंतराळवीरांना पाठवण्याच्या क्यू 9 मोहिमेची तयारी करत आहे. अंतराळ स्थानकावरून सुनीता विल्यम्स परतीची अजून कोणतीच खबर नाही.
Astronauts Ready for NASA's Crew-9 Mission to ISS in August
Astronauts Ready for NASA's Crew-9 Mission to ISS in Augustesakal
Updated on

Sunita Williams in Space : अंतराळ संशोधनाला नवी दिशा देणाऱ्या नासाने १८ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) अंतराळवीर पाठवण्याच्या क्यू 9 मोहिमेची तयारी जोरात सुरू केली आहे. या मोहिमेत झेना कार्डमन, निक हाग, स्टेफनी विल्सन आणि रॉसकोसमचे अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव यांना स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाद्वारे आयएसएसवर पाठवण्यात येणार आहे.

दरम्यान, नासा पुढे एक मोठे आव्हानही समोर आहे. सध्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोर हे बोईंगच्या स्टारलाइनर यानातील तांत्रिक अडचणींमुळे अंतराळ स्थानकावरच अडकले आहेत. या दोघांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी नासा विविध पर्याय शोधत आहे. त्यात स्पेसएक्सचे ड्रॅगन यान वापरण्याचाही विचार आहे.

Astronauts Ready for NASA's Crew-9 Mission to ISS in August
China Secret Spacecraft : चीनने अंतराळात सोडलेल्या 'सिक्रेट' वस्तूमुळे जग चिंतेत; नेमकं काय आहे प्रकरण?

सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर 5 जून रोजी बोईंग स्टारलाइनर या स्पेस एक्सच्या यानातून अंतराळ स्थानकावर गेले होते. ते अंतराळ स्थानकावर दहा दिवस थांबणार होते आणि संशोधन करून परतण्याची त्यांची मोहीम होती;परंतु बॉइंग स्टारलाइनर यानामध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे या अंतराळवीरांची पृथ्वीवर परती तब्बल 52 दिवस झाले थांबवण्यात आली आहे. स्टारलाईनर यानामध्ये हेलियमची गळती झाल्याचे आढळल्यानंतर त्यांची परती लांबणीवर पडली आहे. नासा प्रत्येक बाजूने त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे असे नासाकडून सांगितले जात आहे.

Astronauts Ready for NASA's Crew-9 Mission to ISS in August
Suinta Williams in Space : सुनीता विलियम्सचा पृथ्वीवरील परतीचा प्रवास पुन्हा लांबणीवर; नासाने सांगितेल्या कारणामुळे चिंता वाढली

या यानामध्ये हेलियम गळती आढळल्यानंतर नासावर अनेक आरोप करण्यात आले होते. या हेलियम गळतीची नासाला पूर्वकल्पना असल्याचे आरोप देखील एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने लावले होते.

या दोन्ही मोहिमांमुळे आयएसएसवरील वाहतूक व्यवस्थापनासमोरही आव्हान निर्माण झाले आहे. स्टारलाइनरला डॉकिंग पोर्ट्स रिक्त करण्यासाठी लवकरच आयएसएसवरून काढून घ्यावे लागेल, असे नासाच्या आयएसएस कार्यक्रम व्यवस्थापक दाना वेगेल यांनी सांगितले. या सर्व आव्हानांना तोंड देत नासा अंतराळ स्थानकावरील संशोधनाला सुरु ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे.

Astronauts Ready for NASA's Crew-9 Mission to ISS in August
Olympics in Space : सुनीता विल्यम्स अंतराळातून ऑलिम्पिक सोहळ्यात झाली सहभागी, खेळले 'हे' गेम्स, व्हायरल व्हिडिओ पाहाच

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटमध्ये झालेल्या अपघातानंतर अमेरिकेच्या फेडरल एविएशन अॅडमिनिस्ट्रेशनने (एफएए) या रॉकेटला उड्डाणास परवानगी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.