Starliner Helium Leak: हेलियम गळतीची पूर्वकल्पना होती तरी नासाने...; सुनीता विल्यम्स यांच्याबाबत धक्कादायक खुलासा

Sunita Williams Trapped: नासाचे स्टारलाइनर अंतराळयान आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर (ISS) दोन अंतराळवीरांना घेऊन गेले होते.मात्र,आता हे अंतराळयान अवकाशात अडकलं आहे.
Astronauts' Return Delayed as NASA Overlooked Starliner Helium Leak
Astronauts' Return Delayed as NASA Overlooked Starliner Helium Leakesakal
Updated on

NASA : नासाचे स्टारलाइनर अंतराळयान आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर (ISS) सुनीता विलियम्स आणि बच विल्मोर या दोन अंतराळवीरांना घेऊन गेले होते. मात्र, आता हे अंतराळयान अवकाशात अडकलं असून पृथ्वीवर परतीचा कार्यक्रम कमीतकमी २ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. आता एका धक्कादायक वृत्तानुसार, अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाला प्रक्षेपणाआधीच हेलियम गळतीची माहिती होती. पण या गळतीवर गांभीर्याने लक्ष न देता या मोहिमेसाठी हिरवा झेंडा दाखवला,अशी माहिती समोर आली आहे.

पण, अंतराळात पोहोचल्यानंतर यानात आणखी चार हेलियम गळती आढळल्या. यामुळे जेट इंजिन (थ्रस्टर) निकामी झाली आहे. आता सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्याशिवाय अंतराळवीर भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बच विल्मोर यांची पृथ्वीवर परती सध्या होणार नाही.

एका वृत्तसंस्थेनुसार, NASA या गळतीचे आणि इंजिनचे पुन्हा परीक्षण करणार आहे. त्यानंतर पुढील परतीची तारीख निश्चित केली जाईल. अहवालात असेही म्हटले आहे, की परतीच्या विलंबात २ जुलैपेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे.

Astronauts' Return Delayed as NASA Overlooked Starliner Helium Leak
Sunita Williams Trapped :सुनीता विल्यम्स अडचणीत! अंतराळातच अडकल्या; नासाकडून परतीसाठी प्रयत्न सुरु, जाणून घ्या काय आहे कारण

सुनीता विलियम्स आणि बच विल्मोर सुरक्षित आहेत का?

स्टारलाइनरमध्ये अडथळा निर्माण झाल्याच्या सर्व अटकळांच्या आणि चर्चांच्या दरम्यान, NASA ने स्पष्ट केले आहे की अंतराळयानातील दोन्ही अंतराळवीर सुरक्षित आहेत आणि ते अडकलेले नाहीत. जर कोणतीही अडचण किंवा समस्या निर्माण झाली तर ते अंतराळयानातून बाहेर पडून कोणत्याही वेळी पृथ्वीवर परत येण्यास सक्षम आहेत.

परंतु पृथ्वीवरील Boeingच्या अधिकाऱ्यांसाठी ही परिस्थिती इतकी सोपी नसेल. गेल्या वर्षात झालेल्या विमान अपघातांमुळे बोइंग कंपनी आधीच अडचणीत आहे. यावर आता स्टारलाइनरची ही अडचण म्हणजे त्यांच्यासाठी आणखी त्रासदायक बाब आहे. किमान २० लोकांनी कंपनीच्या सुरक्षा आणि गुणवत्ता मानकांमधील त्रुटी दाखवल्या आहेत आणि चिंता व्यक्त केल्या आहेत.

Astronauts' Return Delayed as NASA Overlooked Starliner Helium Leak
ISRO Rocket Launch: भारताची अंतराळ क्षेत्रात मोठी झेप! ISRO जुलैमध्ये लाँच करणार सगळ्यात लहान उपग्रह

NASA पुढे काय करणार?

NASAच्या व्यावसायिक क्रू कार्यक्रमाचे व्यवस्थापक स्टीव्ह स्टिच म्हणाले, "आम्ही वेळ घेत आहोत आणि आमच्या मानक मिशन व्यवस्थापन टीमच्या प्रक्रियेचे पालन करत आहोत."

ते म्हणाले की आम्ही निर्णय डाटाच्या आधारे घेतो. आम्ही आयोग स्तरावर Review करू, जसे आम्ही NASAच्या SpaceX Demo-2 मिशनच्या दोन महिन्यांच्या अंतराळातील वास्तव्यानंतर केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.