Apollo 11 Mission : संपूर्ण मानवजातीसाठी ऐतिहासिक दिवस! आजच्याच दिवशी नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर ठेवलं होता पाऊल

मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्याची घटना आठवताच आजही सर्वांच्या अंगावर रोमांच उभारतात..
Apollo 11 Mission
Apollo 11 MissioneSakal
Updated on

आजचा दिवस हा मानवी इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. कारण आजच्याच दिवशी अमेरिकी अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवलं होतं. 'एखाद्या मानवासाठी हे छोटंसं पाऊल असेल, मात्र संपूर्ण मानवजातीसाठी ही मोठी झेप आहे' असं नील आर्मस्ट्राँग यावेळी म्हणाले होते.

मानवाला चंद्रावर उतरून ५४ वर्षं होऊन गेली आहेत. मात्र, अजूनही ही घटना आठवताच सर्वांच्या अंगावर रोमांच उभारतात. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या अपोलो ११ या मोहीमेचं हेच सर्वात मोठं यश आहे. १६ जुलै १९६९ रोजी अंतराळात झेपावलेलं हे यान, अवघ्या चार दिवसांमध्ये चंद्रावर पोहोचलं होतं. २० जुलै रोजी हे यान यशस्वीपणे चंद्रावर उतरलं, आणि अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले. यानंतर २४ जुलै रोजी हे यान पृथ्वीवर परत आलं होतं. (First Human on Moon)

Apollo 11 Mission
Chandrayaan-3 : लुना-2, अपोलो ते चांद्रयान; या आहेत जगातील 10 मोठ्या चंद्र मोहिमा

अपोलो ११ मोहीम

मानवाला चंद्रावर पाठवण्यासाठी नासाने अपोलो ११ ही मोहीम राबवली होती. फ्लोरिडामधील केप कॅनेव्हरल येथील पॅड 39A वरून अपोलो ११ या यानाचे लाँचिंग करण्यात आले होते. यासाठी नासाच्या सॅटर्न-५ या रॉकेटचा वापर करण्यात आला होता. अपोलो ११ यानामध्ये तीन अंतराळवीर होते. नील आर्मस्ट्राँग, बझ अल्ड्रीन आणि कमांड मॉड्यूल पायलट मायकल कॉलिन्स हे तिघे या यानात होते. लाँचिंगनंतर केवळ ११ मिनिटांमध्ये हे यान पृथ्वीच्या अंतराळ कक्षेत पोहोचलं होतं.

यानंतर १०२ तास, ४५ मिनिटांनंतर हे यान चंद्रापर्यंत पोहोचलं होतं. यानंतर या यानातील केवळ ईगल लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं होतं. तर कोलंबिया हे स्पेसक्राफ्ट चंद्रावरच तरंगत राहिलं. ईगल लँडरमध्ये केवळ नील आर्मस्ट्राँग आणि बझ अल्ड्रीन हे दोघेच होते. लँडर चंद्रावर उतरल्यानंतर नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर पहिल्यांदा उतरले, त्यानंतर बझ अल्ड्रीन देखील चंद्रावर उतरले होते. (Neil Armstrong, Buzz Aldrin)

Apollo 11 Mission
ISRO Moon Mission : चांद्रयान-२ पासून धडा घेत केल्या चांद्रयान-३ मध्ये सुधारणा; 'या' गोष्टींमुळे यशस्वी होणार यंदाची मोहीम

तुटला होता संपर्क

अपोलो-११ ला जेव्हा अवकाशात लाँच केलं होतं, तेव्हा काही काळासाठी नासाचा या रॉकेटशी असणारा संपर्क तुटला होता. यानंतर आता या यानाशी कधीच संपर्क होऊ शकणार नाही, असा कयास सर्वांनी व्यक्त केला होता. त्यामुळे नासाचे वैज्ञानिक अगदी निराश झाले होते. मात्र, चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा अपोलो -११ चा नासाशी संपर्क झाला. यानंतर सर्वांच्याच जीवात जीव आला. (Apollo 11 Moon Mission)

लाखो लोकांचे प्रयत्न

नासाने दिलेल्या माहितीनुसार, अपोलो-११ या मोहिमेशी सुमारे ४ लाख लोक जोडले गेले होते. ही मोहीम यशस्वी होण्यामागे या सर्व लोकांचा हात असल्याचं मत नील आर्मस्ट्राँग यांनी व्यक्त केलं होतं.

Apollo 11 Mission
Chandrayaan-3 Budget : 'चांद्रयान-२' पेक्षा स्वस्त आहे 'चांद्रयान-३' मोहीम; पाहा किती आला खर्च

सहा वर्षांपासूनची तयारी

चंद्रावर मानवाला पोहोचवण्यासाठी नासाला एका अत्यंत शक्तिशाली आणि ह्यूमन-सेफ असं लूनार मॉड्यूल बनवण्याची गरज होती. यासाठी तब्बल सहा वर्षांपासून तयारी करण्यात येत होती. या यानाचं नाव ईगल ठेवण्यात आलं होतं. हे लूनार मॉड्यूल तेव्हाच्या काळात जगातील सर्वात शक्तिशाली इंजिन होतं.

प्रोजेक्ट जेमिनी

नासाने यापूर्वी अंतराळात मानवाला पाठवल्यास काय परिणाम होतो, अंतराळवीरांच्या आरोग्यावर अंतरिक्षातील वातावरणाचा कसा प्रभाव पडतो याबाबत अभ्यास सुरू केला होता. यासाठी १९६१ साली प्रोजेक्ट जेमिनीची सुरुवात करण्यात आली होती. १९६१ ते १९६६ पर्यंत चाललेल्या या प्रोजेक्टमध्ये दहा वेळा अंतराळवीरांना अवकाशात नेऊन परत आणण्यात आले. यातून मिळालेली माहिती अपोलो ११ मोहिमेसाठी भरपूर उपयोगी ठरली.

Apollo 11 Mission
Chandrayaan-3 Timeline : प्रक्षेपणापासून ते चंद्रावर उतरेपर्यंत, काय काय करणार चांद्रयान-3, वाचा संपूर्ण टाइमलाइन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.