NASA Cat Video : नासाने अंतराळातून पाठवला मांजराचा व्हिडिओ; मानवाला मंगळावर जाण्यासाठी होणार याची मदत

Video from Deep Space : मांजराचा एक व्हिडिओ स्ट्रीम करणे ही घटना अगदी साधारण वाटत असली, तरी नासाने मिळवलेलं हे यश अगदी ऐतिहासिक आहे.
NASA Cat Video
NASA Cat VideoeSakal
Updated on

NASA Streams Ultra-HD Video of Cat :

नासाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोफ्यावर बसलेलं एक मांजर लेझर डॉटचा पाठलाग करत खेळत आहे असं यामध्ये दिसतंय. हा मजेशीर व्हिडिओ भविष्यात मानवाला मंगळावर जाण्यासाठी मदत करणार आहे, असं नासाने म्हटलं आहे. कसं? जाणून घेऊया.

नासाने (NASA) आपल्या अधिकृत एक्स हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये नासाने म्हटलं आहे, "आम्ही नुकताच एक अल्ट्रा-एचडी व्हिडिओ स्ट्रीम केला आहे. हा व्हिडिओ डीप स्पेसमधून (Deep Space) लेझरच्या सहाय्याने पाठवण्यात आला आहे. यामध्ये दिसणाऱ्या मांजराचं नाव 'टेटर्स' आहे. या चाचणीमुळे हाय-डेटा-रेट कम्युनिकेशन्ससाठी मार्ग तयार होणार आहे, ज्याचा फायदा मानवाला मंगळावर पाठवण्यासाठी होईल."

ऐतिहासिक आहे घटना

मांजराचा एक व्हिडिओ स्ट्रीम (NASA Cat Video Stream) करणे ही घटना अगदी साधारण वाटत असली, तरी नासाने मिळवलेलं हे यश अगदी ऐतिहासिक आहे. पृथ्वीवर इंटरनेट स्ट्रीमिंग किंवा कॉलिंगसाठी जसे टॉवर्स किंवा ऑप्टिकल फायबर्सचं जाळं आहे; तसं अंतराळात नाही. त्यामुळे स्पेसमध्ये एकमेकांशी संवाद (Space Communication) साधण्यासाठी मोठ्या बँडविड्थची गरज भासते.

यामुळेच नासाने डीप स्पेसमधून पाठवलेला हा व्हिडिओ, तिथपर्यंत आपण आता संपर्क साधू शकतो याची पावती आहे. यामुळे भविष्यात एका ग्रहावरुन दुसऱ्या ग्रहावर सुस्पष्ट संवाद (Interplanetary Communication) साधणं शक्य होणार आहे, अशी माहिती नासाच्या डेप्युटी अ‍ॅडमिनिस्ट्रेटर पॅम मेलरॉय यांनी दिली. नासाने हा व्हिडिओ पृथ्वीपासून तब्बल 31 मिलियन किलोमीटर दूर असणाऱ्या एका स्पेसशिपमधून पाठवला आहे. (It is a historical event)

NASA Cat Video
नासाला मिळाले 17 नवे ग्रह; बर्फाळ जमीनींखाली दडलाय महासागर

मांजराचा व्हिडिओ का?

या व्हिडिओमध्ये दिसणारं मांजर हे नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीमधील (JPL) एका कर्मचाऱ्याचं आहे. इंटरनेटवर लोकांना मांजरांचे मजेशीर व्हिडिओ पहायला आवडतं. त्यामुळेच जेपीएलमधील कर्मचाऱ्यांनी हाा व्हिडिओ वापरण्याचा निर्णय घेतला.

यासोबतच याला एक ऐतिहासिक कारणही आहे. 1928 साली जेव्हा टेलिव्हिजन ब्रॉडकास्ट ट्रान्समिशनची चाचणी घेण्यात आली होती, तेव्हा त्यासाठी देखील फेलिक्स (Felix) या कार्टूनमधील मांजराच्या पुतळ्याचा वापर करण्यात आला होता. (Why video of cat?)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.