NASA : अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने (NASA) अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या अंतराळ मोहिमाबद्दल महत्त्वाचे अपडेट दिले आहे. यापूर्वी वाढवण्यात आलेल्या मोहिमेची परतीची तारीख आणखी वाढण्याची शक्यता आहे. अंतराळयानाची स्थिती चांगली असून ते अधिक काळ कार्यरत राहू शकते असे NASA ने म्हटले आहे.
सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांना घेऊन गेलेलं स्टारलाइनर हे अंतराळयान जूनमध्ये अवकाशात जाण्यासाठी निघाले होते. पण काही तांत्रिक अडचणींमुळे मोहिम उशीर झाली होती. त्यानंतर अंतराळयानाला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर (ISS) डॉक करण्यात आलं.
मात्र, हेलियम लीक (Helium Leak) ची समस्या आल्याने हे दोन्ही अंतराळवीर तेथेच अडकून राहिले आहेत.
सुरुवातीला ही अंतराळ मोहिम एक आठवड्याची असणार होती. पण आता या मिशनची मुदत तब्बल ४५ दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे. नासाच्या कॉमर्शियल क्रू प्रोग्रामचे व्यवस्थापक स्टीव्ह स्टिच यांनी ही माहिती दिली आहे.
अंतराळयानाच्या बॅटरीज चांगल्या स्थितीत असून त्या आणखी काळ टिकू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु परतीची तारीख अद्याप निश्चित झाली नाहीये.
अंतराळयानाच्या इंजिनमध्ये काही अडचणी आल्याने त्यांची तपासणी करण्यासाठी New Mexico येथे चाचण्या घेतल्या जाणार आहेत. या चाचण्यांच्या अहवालानुसार अंतराळयानाची परतीची तारीख लवकरच निश्चित केली जाईल असं नासाने सांगितलं आहे.
"आम्ही अंतराळयानाला घाईघाईने परत आणण्याच्या विचारात नाही आहोत," असंही स्टीव्ह स्टिच यांनी स्पष्ट केलं. सुनीता विल्यम्स आणि सहकाऱ्यांची अंतराळातील वाटचाल वाढण्याची शक्यता असून त्यांच्या सुरक्षेची कोणतीही चिंता नसल्याचं नासाने आश्वासन दिलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.