McLaren 765LT: देशातील सर्वात महागडी कार खरेदी करणारा नसीर खान नक्की करतो काय? जाणून घ्या

हैदराबाद येथील एका व्यावसायिकाने तब्बल १२ कोटी रुपये खर्चून McLaren 765LT सुपर कार खरेदी केली आहे. ही देशातील सर्वात महागडी कार आहे.
McLaren 765LT
McLaren 765LTSakal
Updated on

McLaren 765LT Car Details: अनेकांना बाजारात येणाऱ्या नवनवीन वस्तूंचे कलेक्शन करण्याची आवड असते. काहीजण गाड्यांचे कलेक्शन करतात, तर काहीजण टी-शर्ट, पोस्टर्स यांचे कलेक्शन करत असतात. हैदराबादच्या एका व्यावसायिकाकडे लग्झरी गाड्यांचे मोठे कलेक्शन आहे. याच व्यक्तीने आता जवळपास १२ कोटी रुपये खर्चून देशातील सर्वात महागडी कार खरेदी केली आहे. या व्यक्तीचे नाव नसीर खान असे आहे.

ब्रिटनची प्रमुख कार कंपनी असलेल्या McLaren ने भारतीय बाजारात एंट्री केली आहे. कंपनीने मुंबईत आपले शोरुम उघडले आहे. याच शोरुममधून नसीर खानने १२ कोटींची McLaren 765LT सुपर कार खरेदी केली आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर- कशाने मिळेल सूट, कशावर भरावा लागेल कर....

कोण आहे नासिर खान?

नसीर खान हैद्राबादमधील एक व्यावसायिक आहे. वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये तो गुंतवणूक करतो. तो Kings Group of Companies चा डायरेक्टर देखील आहे. ही कंपनी हैद्राबादमध्ये रियल इस्टेट आणि कंस्ट्रक्शनचे काम करते. त्याच्याकडे Rolls Royce Cullinan Black Badge, Ferrari 812 Superfast, Mercedes-Benz G350d, Ford Mustang, Lamborghini Aventador, Lamborghini Urus सारख्या इतरही लग्झरी कार्स आहेत.

McLaren 765LT
Twitter: एलॉन मस्कचा पाठलाग करत होता पठ्ठ्या, आता ट्विटरने उचलले मोठे पाऊल; पाहा डिटेल्स

McLaren 765LT सुपरकारचे वैशिष्ट्ये

McLaren 765LT मध्ये पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. यात दिलेले इंजिन ७५५ हॉर्स पॉवर्स जनरेट करतात. ही एक लिमिटेड प्रोडक्शन कार असून, याच्या केवळ ७६५ यूनिट्सची विक्री केली जाईल. कारमध्ये ४.० लीटरचे ४००० सीसी ट्विन टर्बोचार्ज्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ७ स्पीड ड्यूल क्लच ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह येते. कार अवघ्या २.४ सेकंदात ताशी १०० किमी आणि ५.४ सेकंदात ताशी १६० किमीचा वेग पकडते.

रिपोर्टनुसार, McLaren 765LT चे माइलेज शहरात ५.९ किमी, तर हायवेवर ७.५ किमी आहे. या सुपरकारचे इंटेरियर देखील खास आहे. कंपनीने याआधीच्या तुलनेत McLaren 765LT च्या इंटरेयिरला कस्टमाइज केले आहे. जेणेकरून, कारचे वजन कमी करता येईल.

McLaren 765LT
Cyber Attack: AIIMS वरील सायबर हल्ल्यामागे चीनचा हात? धक्कादायक माहिती आली समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.