दुकानदारकांनाही मिळणार पेन्शन; जाणून घ्या, कसा घ्याल लाभ

या योजनेअंतर्गत दुकानदारांना मिळते तीन हजार रुपये पेन्शन
Pension
Pensionsakal media
Updated on
Summary

पूर्वी पेन्शनची सुविधा नोकरदार लोकांनाच मिळत असली तरी आता दुकानदारही या सरकारी योजनेत त्याचा लाभ घेऊ शकतात.

देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सरकारकडून सर्व प्रकारच्या योजना चालवल्या जाताहेत. या आदेशामध्ये केंद्र सरकारकडून आणखी एक विशेष योजना सुरु असून, त्याअंतर्गत दुकानदारांना म्हणजेच स्वत:चा व्यवसाय (Business) करणाऱ्यांनाही वयाच्या 60 व्या वर्षानंतर पेन्शन (Pension) मिळू शकणार आहे. पूर्वी पेन्शनची सुविधा नोकरदार लोकांनाच मिळत असली तरी आता दुकानदारही या सरकारी योजनेत त्याचा लाभ घेऊ शकतात.

Pension
Government Scheme : पती-पत्नीला महिना 10,000 रुपये पेन्शन, जाणून घ्या स्किम

वास्तविक पाहता ही सुविधा राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत देण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीचे भविष्य सुरक्षित असू शकते. तुम्हालाही या योजनेत सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. खरे तर या योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी तुमच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल दीड कोटी रुपये किंवा त्यापेक्षा कमी असायला हवी.

Pension
जेष्ठ नागरिक म्हणून शासनाच्या पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थींचा शोध

राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) ही ऐच्छिक योजना आहे. ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली. यामध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा किमान तीन हजार रुपये पेन्शन मिळते.

राष्ट्रीय पेन्शन योजनेत नोंदणी करण्यासाठी अर्जदाराचे (व्यापारी) वय 18 ते 40 वर्षांदरम्यान असावे. त्याचबरोबर व्यवसायाची वार्षिक उलाढाल दीड कोटी रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

Pension
'ई-श्रम'वर करा नोंदणी! दरमहा मिळेल तीन ते पाच हजारांची पेन्शन व निवृत्ती वेतन

एनपीएस अंतर्गत नोंदणीसाठी तुमच्याकडे आधार कार्ड, सेव्हिंग्ज बँक अकाउंट आणि जनधन खाते क्रमांक असणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभार्थी मृत्यू पावला तर अर्जदाराच्या पेन्शनपैकी 50 टक्के रक्कम नॉमिनेट (पती/पती)ला दिली जाते. कौटुंबिक पेन्शन म्हणून देण्यात येणार आहे. या योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी आपण maandhan.in देखील भेट देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.