जगभरात टेक्नॉलॉजीने अनेक गोष्टी घडवल्या आहेत. ज्या गोष्टी आजवर स्वप्नवत वाटत होत्या, त्या खऱ्या होत आहेत. मोबाईल फोन, इंटरनेटने तर जगभरातील लोक जवळ आले आहेत. ज्या काळात इंटरनेट नव्हते, फारशा सुविधा नव्हत्या.
त्या काळात राजस्थानमधील पोखरण येथे अणुबॉम्ब चाचणी घडवून भारताने इतिहास रचला आहे. त्याचीच आठवण म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. त्याबद्दल आपण अधिक माहिती घेऊयात.
आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आहे. हा दिवस दरवर्षी 11 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या यशस्वी अणुचाचण्यांची आठवण करून देतो. हा दिवस भारतीय शास्त्रज्ञांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे.
भारताला विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या विकासात पुढे नेण्यात शास्त्रज्ञांचे मोठे योगदान आहे. 1999 पासून दरवर्षी, तंत्रज्ञान विकास मंडळ (TDB) हा दिवस साजरा करते.
यंदाची थीम काय आहे?
या वर्षीच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाची थीम From Schools to Startups: Igniting Young Minds to Innovate, अशी आहे.
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारतीय शास्त्रज्ञांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी या दिवसाला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हटले.
भारतातील पहिली चाचणी
भारतातील पहिली अणुचाचणी 1974 मध्ये घेण्यात आली, ज्याला ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा असे नाव देण्यात आले. यानंतर, 11 मे 1998 रोजी राजस्थानच्या पोखरणमध्ये दुसरी अणुचाचणी घेण्यात आली आणि ती पोखरण-II ऑपरेशन शक्ती म्हणून ओळखली गेली.
या यशस्वी ऑपरेशनचे नेतृत्व तत्कालीन राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी केले. याशिवाय या दिवशी भारताने त्रिशूल क्षेपणास्त्र आणि पहिल्या स्वदेशी विमान 'हंसा-3'चीही यशस्वी चाचणी घेतली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.