NEET 2024 Results : डॉक्टर बनण्याचे स्वप्न असलेल्या विद्यार्थ्यांचं पहिलं ध्येय असतं ते देशातील प्रसिद्ध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवणे. यासाठी विद्यार्थी NEET या कठीणप्रवेश परीक्षेची तयारी करतात. या वर्षाच्या NEET परीक्षेचा निकाल नुकताच आला आहे, ज्यामध्ये 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले आहेत.
अशात विद्यार्थ्यांमध्ये एकच संभ्रम असतो की कोणत्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल,कोणतं महाविद्यालय अधिक चांगलं. तर जाणून घेऊया आपल्या देशातील टॉप 10 वैद्यकीय महाविद्यालये कोणती आहेत.
NEET UG 2024 चा निकाल नुकताच लागला आहे. या वर्षी 57 टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत आणि सुमारे 67 विद्यार्थी टॉपरच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. उदयपूरच्या ईशा कोठारीने या परीक्षेत ऑल इंडिया रँक वन मिळवली आहे. आता ईशा दिल्लीस्थित AIIMS मध्ये डॉक्टरी शिकण्याचा विचार करत आहे.
देशातील टॉप वैद्यकीय संस्थांच्या यादीत दिल्लीचे AIIMS पहिल्या क्रमांकावर येते. NEET UG परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना देशातील प्रसिद्ध संस्थांमधून वैद्यकीय शिक्षा घेण्याची संधी मिळते, परंतु या विद्यापीठांचा कटऑफ इतका जास्त असतो की तो पार करणे सर्वांनाच शक्य नसते.
केवळ NEET UG परीक्षेत चांगले गुण मिळवून कटऑफ गाठलेले विद्यार्थीच या संस्थांमध्ये प्रवेश घेऊ शकतात. अशात NIRF ने जारी केलेल्या लिस्टप्रमाणे जाणून घेऊया आपल्या देशातील टॉप 10 वैद्यकीय महाविद्यालये कोणती आहेत.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS),नई दिल्ली -94.32
पोस्ट ग्रेजुएट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल एजुकेशन एंड रिसर्चं,चंडीगढ़-81.80
क्रिश्चियन मेडिकल कॉलेज,वेल्लोर तमिलनाडु -75.29
राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य एवं तंत्रिका विज्ञान संस्थान,कर्नाटक-72.10
अमृता विश्व विद्यापीठम- कोयंबटूर तमिलनाडु,-70.84
संजय गांधी पोस्ट ग्रेजुएट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज,लखनऊ उत्तर प्रदेश-69.62
बनारस हिंदू विश्वविद्यालय,वाराणसी उत्तर प्रदेश-68.75
कस्तूरबा मेडिकल कॉलेज, मणिपाल कर्नाटक-66.19
श्री चित्रा तिरुनल इंस्टीट्यूट फॉर मेडिकल साइंसेज एंड टेक्नोलॉजी,तिरुवनंतपुरम केरळ-65.24
किंग जॉर्ज मेडिकल यूनिवर्सिटी,लखनऊ उत्तर प्रदेश-63.93
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.