Neil Armstrong : हवेत उडण्याचं स्वप्न पाहिलं; अन् थेट चंद्रावर ठेवलं पाऊल! कसा होता नील आर्मस्ट्राँगचा प्रवास?

Neil Armstrong Death Anniversary : 25 ऑगस्ट 2012 साली हृदयविकाराच्या धक्क्याने नील आर्मस्ट्राँग यांचं निधन झालं.
Neil Armstrong Death Anniversary
Neil Armstrong Death AnniversaryeSakal
Updated on

First Human On Moon : चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा मानव म्हटलं की आपल्यासमोर नाव येतं ते नील आर्मस्ट्राँगचं. लहानपणीच हवेत उडण्याचं स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या आर्मस्ट्राँगला आपण पुढे जाऊन कधी एवढं मोठं कार्य करू, असं वाटलंही नसेल.

खरंतर, नील आर्मस्ट्राँग यांचं केवळ चंद्रावर जाण्याबाबत कौतुक करणं हे अगदी चुकीचं आहे. कारण आपल्या करिअरमध्ये त्यांनी आणखी कित्येक कौतुकास्पद गोष्टी केल्या होत्या. ते केवळ एक अंतराळवीरच नव्हे, तर एअरोस्पेस इंजिनिअर, नौसेना अधिकारी, टेस्ट पायलट आणि प्राध्यापक देखील होते.

Neil Armstrong Death Anniversary
Apollo 11 Mission : संपूर्ण मानवजातीसाठी ऐतिहासिक दिवस! आजच्याच दिवशी नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर ठेवलं होता पाऊल

5 ऑगस्ट 1930 साली नील आर्मस्ट्राँगचा जन्म झाला होता. त्यांचे वडील सरकारी अधिकारी होते. त्यामुळे त्यांची वारंवार बदली होत. नीलच्या जन्मानंतर त्यांची जवळपास 20 ठिकाणी बदली झाली होती. त्यामुळेच लहानग्या नीलला विमानात बसण्याची, आणि एकूणच हवेत उडण्याची आवड निर्माण झाली. अवघ्या पाच वर्षे वयातच त्यांनी पहिल्यांदा विमान सफर केली होती.

वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी एअरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरू केला होता. पुढे त्यांनी MIT मध्ये देखील शिक्षण घेतलं. गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयांमध्ये त्यांना रुची होती. सोबतच खगोलशास्त्र आणि ब्रह्मांड विज्ञान हे विषय देखील त्यांचे आवडते होते. अगदी कमी वयातच त्यांनी आपलं स्टुडेंट पायलेट लायसन्स मिळवलं होतं.

कसं होतं करिअर?

आर्मस्ट्राँग हे एक इंजिनिअर, टेस्ट पायलट, अंतराळवीर आणि नौसेना अधिकारी देखील होते. त्यांनी कित्येक प्रकारची विमानं उडवली. यामध्ये तब्बल 4,000 किमी प्रतितास वेगाने जाणाऱ्या एक्स-15 विमानाचाही समावेश होता. सोबतच कित्येक जेट, रॉकेट, हेलिकॉप्टर आणि ग्लायडर देखील त्यांनी उडवले आहेत.

Neil Armstrong Death Anniversary
Apollo 11 Mission : एका साध्या पेनानं वाचवले होते नील आर्मस्ट्राँगचे प्राण

अंतराळवीर म्हणून प्रवास

16 मार्च 1966 रोजी नील आर्मस्ट्राँग पहिल्यांदा अंतराळात गेले. जेमिनी-8 या मोहिमेसाठी त्यांची निवड झाली होती. त्यानंतर अपोलो-11 मोहिमेमध्ये चंद्रावर जाऊन त्यांनी इतिहास रचला. "एका मानवाचं हे छोटंस पाऊल, संपूर्ण मानवजातीसाठी एक मोठी झेप आहे", असं त्यांनी चंद्रावर उतरल्यानंतर म्हटलं होतं. सुमारे 2.30 तास ते चंद्रावर राहिले, त्यानंतर ते पृथ्वीवर परत आले.

नील आर्मस्ट्राँग यांनी विविध प्रकारे आजन्म देशसेवा केली. त्यांना कित्येक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव म्हणून त्यांची इतिहासात नोंद झाली आहे. ते 82 वर्षांचे असताना 25 ऑगस्ट 2012 साली हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं. नील आर्मस्ट्राँग यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.