Netflix Livestream Crash : जगभरातील बॉक्सिंग चाहत्यांसाठी मोठी अपेक्षा ठरलेला माइक टायसन आणि जेक पॉल यांचा बहुचर्चित बॉक्सिंग सामना नेटफ्लिक्सच्या थेट प्रक्षेपणात आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे नाराजीचे कारण ठरला. आता जगभरात netflix क्रॅश झाले आहे.
जेक पॉल, जो एक प्रसिद्ध यूट्यूबर असून आता बॉक्सिंगमध्ये उतरला आहे, आणि माइक टायसन, बॉक्सिंगमधील एक दिग्गज, यांचा सामना पाहण्यासाठी जगभरातून लाखो प्रेक्षक नेटफ्लिक्सच्या थेट प्रक्षेपणाला जोडले गेले होते. मात्र, थेट प्रक्षेपण सुरू होण्याआधीच तांत्रिक बिघाडामुळे प्रेक्षकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
थेट प्रक्षेपणाच्या अडचणींमुळे अमेरिकेतील न्यूयॉर्क, सिएटल आणि लॉस एंजल्ससह प्रमुख शहरांतील 85,000 पेक्षा जास्त युजर्सना प्रक्षेपण पाहता आले नाही, असे Downdetector.com ने नोंदवले. "आत्ताच सामना रंगतदार होत असताना नेटफ्लिक्स पुन्हा बंद पडले. मला खूपच त्रास होत आहे," असे एका यूजरने X (पूर्वीचे ट्विटर) वर व्यक्त केले. दुसऱ्याने लिहिले, "सर्वात मोठा सामना पाहण्यासाठी पैसे खर्च केले आणि थेट प्रक्षेपण मुख्य सामन्याच्या आधीच बंद पडले."
सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता आले नसले तरी डलास, टेक्सास येथील AT&T स्टेडियममध्ये 75,000 प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सामना यशस्वीपणे पार पडला. मात्र, नेटफ्लिक्सने या समस्येवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
लाइव्ह स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंगमध्ये उतरलेल्या नेटफ्लिक्ससाठी ही घटना मोठी धडकी भरवणारी ठरू शकते. पुन्हा एकदा प्रेक्षकांचा विश्वास संपादन करणे ही नेटफ्लिक्ससाठी मोठी कसोटी ठरणार आहे.
आठ दोन मिनिटांच्या फेऱ्यांमध्ये झालेल्या या सामन्यात 58 वर्षीय माइक टायसनचा 27 वर्षीय जेक पॉलने एकमताने विजय मिळवला. यामुळे जेक पॉलचा सामना अधिक चर्चेत आला असला, तरी नेटफ्लिक्सच्या अडचणींमुळे हा अनुभव प्रेक्षकांसाठी अपेक्षाभंग करणारा ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.