iPhone Netflix Discontinue : आयफोन अन् iPad डिव्हाइसवर Netflix होणार बंद; कंपनीने युजर्सना दिला मोठा झटका

netflix ends support for older iphone models : Netflix ची सेवा आता काही जुन्या मॉडेलच्या आयफोनवर बंद होणार आहे. याचा अर्थ असा आहे की, तुमच्या जुन्या iPhone आणि ipad मध्ये आता Netflix चालणार नाही.
netflix ends support for older iphone models
netflix ends support for older iphone modelsesakal
Updated on

Netflix Discountinue in iPhone : आपल्या सर्वांच्या आवडत्या Netflix ने लाखो iPhone वापरणाऱ्यांना धक्का दिला आहे. Netflix ची सेवा आता काही जुन्या मॉडेलच्या आयफोनवर बंद होणार आहे. याचा अर्थ असा आहे की, तुमच्या जुन्या iPhone आणि ipad मध्ये आता Netflix चालणार नाही. चला तर मग कोणत्या आयफोनवर Netflix बंद होणार आणि कंपनीने का हा निर्णय घेतला,हे जाणून घेऊया.

कोणत्या आयफोनवर बंद होणार Netflix?

  • आयफोन 8

  • आयफोन 8 प्लस

  • आयफोन X

  • पहिली जनरेशन iPad Pro

  • iPad 5

netflix ends support for older iphone models
Electricity Saving Tips : वाढत्या वीज बिलांमुळे हैराण आहात? या भन्नाट ट्रिकने खर्च होईल निम्मा

कंपनीने का घेतला हा निर्णय?

Netflix चं म्हणणं आहे की, जुन्या व्हर्जनच्या आयफोनवर त्यांची सेवा बंद करण्यामागचा उद्देश वापरकर्त्यांची सुरक्षा आणि गोपनीयता राखणे हा आहे. अत्याधुनिक ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या नवीन डिव्हायसेसवर लक्ष केंद्रित केल्याने Netflix वापरकर्त्यांना अधिक चांगले फीचर्स आणि सुरक्षा देऊ शकतो.

जर तुमच्याकडे सांगितले आहेत ते ओल्ड मॉडेल यापैकी एखादा फोन असेल, तर तुम्ही लवकरच Netflix ची स्ट्रीमिंग सेवा वापरू शकणार नाही. त्यामुळे तुमच्यासाठी नवीन iPhone मॉडेल किंवा पर्यायी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म चालवणारा एखादा Android स्मार्टफोन घेण्याची हीच वेळ आहे.

netflix ends support for older iphone models
Micromax in OTT : शिक्षकाचा मुलगा मुकेश अंबानींना देणार टक्कर; OTT अन् AI क्षेत्रात एंट्री, एकेकाळी स्मार्टफोन मार्केटवर केलंय राज्य

असंख्य टेक्नो कंपन्या जुन्या व्हर्जनच्या डिव्हायसेसवर त्यांच्या सेवा बंद करत आहेत. यापूर्वी WhatsApp नेही असाच निर्णय घेतला होता. सुरक्षा आणि कार्यक्षमता राखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत राहणे किती महत्वाचे आहे हे यावरून अधोरेखित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.