Neuralink Chip : मनातील विचारांतून हाताळता येणार संगणक

मानवी मेंदूत प्रथमच ‘चिप’चे प्रत्यारोपण; एलॉन मस्क यांच्या कंपनीकडून चाचणी
neuralink chip human brain transplant elon musk innovation science and technology
neuralink chip human brain transplant elon musk innovation science and technologySakal
Updated on

न्यूयॉर्क : ‘टेस्ला’चे मालक एलॉन मस्क यांची स्टार्टअप कंपनी ‘न्यूरालिंक’ने मानवी मेंदूत शस्त्रक्रियेद्वारे ‘चिप’चे प्रत्यारोपण केले आहे. मानवी मेंदूत ‘चिप’ बसविण्याची ही जगातील पहिलीच घटना असल्याचा दावा करण्यात येत आहे.

‘‘चिप स्टार्टअपमधून रविवारी (ता. २९) पहिल्या मानवात चिप बसविण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीची प्रकृती सुधारत आहे,’’ अशी माहिती मस्क यांनी काल ‘एक्स’वर दिली. प्राथमिक निकाल आशादायी आहेत, असेही त्यांनी सांगितले.

चिपच्या रोपणानंतर मज्जातंतूत वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’नुसार याचे वर्णन पेशी असे केले आहे. मेंदूभोवती आणि शरीराला माहिती पाठविण्यासाठी विद्युत आणि रासायनिक संदेशांचा वापर या पेशी करतात.

अन्य एका पोस्टमध्ये मस्क यांनी लिहिले आहे, की या उपकरणाद्वारे तुम्ही केवळ विचारांतून फोन, संगणक आणि त्यांच्याद्वारे कोणत्याही उपकरणावर नियंत्रण ठेऊ शकाल. ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत, असे रुग्ण याचे सुरुवातीचे उपयोगकर्ते असतील. कल्पना करा की जर स्टीफन हॉकिंग हयात असते तर या उपकरणाच्या मदतीने ते वेगवान टायपिस्ट किंवा लिलावकर्त्यांच्या तुलनेत अधिक वेगाने संदेशवहन करू शकले असते.

मानवी मेंदूत ‘चिप’ बसविण्याच्या पहिल्या प्रयोगासाठी अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने ‘न्यूरालिंक’ला गेल्या वर्षी मंजुरी दिली होती. सुरक्षित प्रत्यारोपण आणि रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे मेंदू आणि संगणक यांच्यात बिनतारी पद्धतीने संपर्क साधणे हे या स्टार्टअपचे मुख्य उद्दिष्ट आहे.

हा संपर्क किती कार्यक्षमतेने होतो, याचा अभ्यास करण्यात येणार आहे. अर्धांगवायूने ज्यांचे अवयव निष्क्रिय झाले आहेत, अशा रुग्णांना केवळ त्यांच्या विचारांतून उपकरणे नियंत्रित करणे शक्य होणार आहे, अशी माहिती ‘न्यूरालिंक’च्या संकेतस्थळावर दिली आहे.

सहा वर्षे होणार अभ्यास

या चाचणीत सहभागी होणाऱ्यांचे किमान वय २२ वर्षे असणे आवश्‍यक आहे. प्रत्यारोपणानंतर त्याचा अभ्यास करण्यास सहा वर्षांचा अवधी लागणार आहे.

‘चिप’चे वैशिष्‍ट्य आणि उपयोग

  • एका छोट्या नाण्याप्रमाणे आकार

  • कंपनीने या पहिल्या उपकरणाचे नाव ‘टेलिपथी’ असे ठेवले आहे

  • मानवी मेंदू आणि संगणकामध्ये थेट संपर्क होऊ शकेल

  • जर ही मानवी चाचणी यशस्वी ठरली तर भविष्यात ‘चिप’च्या माध्यमातून दृष्टिहीन व्यक्तींना पाहणे शक्य होईल

  • अर्धांगवायूचे रुग्ण चालू -फिरू शकतील आणि संगणकही हाताळू शकतील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.