Facebook वर ज्यानेही 'हे' नाव सर्च केलं तो थेट तुरुंगात...,तेव्हा चुकूनही करू नका ही चूक

फेसबुकवर या गोष्टी सर्च केल्यास तुम्हाला कायद्याच्या कचाट्यात अडकावे लागू शकते
Facebook Rule
Facebook Ruleesakal
Updated on

Facebook Rules Awareness : हल्ली सोशल मीडियाकडे यूजर्सचा कल वाढत चाललाय.यात ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकचा सर्वाधिक वापर आहे. मात्र याचा वापर करताना नियम जाणून घेणेही तेवढेच महत्वाचे आहे. चुकून तुम्ही यातील कुठल्याही नियमांचे उलंघन केल्यास तुम्हाला थेट तुरुंगात देखील जावे लागू शकते.

बर्‍याच वेळा आपल्याला नियमांची माहिती नसते आणि त्यामुळे नकळत आपण असे करतो, जे कायदेशीर गुन्ह्याच्या श्रेणीत मोडले जाते. म्हणजेच काहीही चुकीचे केल्यास तुरुंगवास होऊ शकतो. अशा काही गोष्टी आहेत, ज्या चुकूनही सर्च करू नयेत. सर्च केल्यास तुम्हाला कायद्याच्या कचाट्यात अडकावे लागू शकते. तेव्हा जाणून घेऊया कोणत्या गोष्टी सर्च करू नये ते.

चाइल्ड पॉर्नोग्राफीबाबत अतिशय कडक कायदा आहे. याच्याशी संबंधित असा कोणताही व्हिडीओ तुम्हाला आढळला तर तो पाहू नये. तुम्ही असे व्हिडीओ सर्चही करू नका, कारण असे केल्याने तुमच्यावर कारवाई होऊ शकते आणि तुरुंगवासही होऊ शकतो.

फेक न्यूज

गेल्या काही वर्षांत फेक न्यूजचे प्रमाण वाढले आहे. हे थांबवण्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत आहे. फेक न्यूजपासून सावध राहावे. जर तुम्ही आयटी कायद्यांतर्गत खोट्या बातम्या शेअर केल्या तर तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. तुम्हाला कोणतीही बातमी मिळाली तर आधी क्रॉस व्हेरिफिकेशन करा.

Facebook Rule
Secret Facebook Group : इथे स्त्रिया सांगतात त्यांचं डर्टी सीक्रेट, पुरुषांना केलं जातं रिव्ह्यू

असे व्हिडिओ कधीही शेअर करू नका

समाजात फूट पाडणाऱ्या व्हिडिओपासून अंतर ठेवा. शेअर केल्यास तुरुंगवास होऊ शकतो. दिल्ली पोलिसांनी हे कृत्य करणाऱ्यांना नुकतेच ताब्यात घेतले होते. तेव्हा आक्षेपार्ह कुठल्याही गोष्टी सर्च किंवा शेअर करणे आवर्जून टाळले पाहिजे. (Facebook)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.