WhatsApp New Update : इंस्टंट मेसेजींग अॅप WhatsApp सतत वेळोवेळी फीचर्स अपडेट करत राहते. असाच काही अनोखे अपडेट पुन्हा एकदा ही कंपनी हे करणार आहे. आपल्यापैकी बरेच जण दररोज त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन त्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित गोष्टी त्यांच्या मित्रांसोबत शेअर करतात. आता हे स्टेट,स अपडेट करणे आणखी मजेशीर होणार आहे. कंपनी त्यात लवकरच त्यात नवीन अपडेट घेऊन येत आहे.
आता तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये दिसणाऱ्या एखाद्याच्या प्रोफाइल पिक्चरवर हिरव्या रंगाची रिंग बनवली जाईल, ज्यावर वापरकर्ते टॅप करुन स्टेटस पाहू शकतील. या आधी तुम्हाला एखाद्याचे स्टेटस पाहण्यासाठी स्टेटसवर जाऊन मग पाहाता येत असे. मात्र, कंपनीकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
व्हॉट्सअॅप च्या लेटेस्ट अपडेटबद्द्ल माहिती देणारी वेबसाईट WABetaInfo च्या रिपोर्टनिसार, स्टेटस फीचर अपडेट नंतर जर वापरकर्त्याने त्याचे स्टेटस अपलोड केले, तर त्याचे प्रोफाईल फोटोवर हिरव्या रंगाचे रिंग बनेल, त्यामुळे हे समजेल की या वापरकर्त्याने नुकतेच स्टेटस अपडेट केले आहे. हे फीचर बीटा व्हर्जन 2.21.17.5 मध्ये देण्यात आले आहे. असे मानले जाते की या फीचरची सध्या चाचणी केली जात आहे आणि कंपनी लवकरच याची घोषणा करू शकते. हे फीचर बऱ्यापैकी इंस्टाग्राम सारखे असेल. इंस्टाग्राममघ्ये ज्याप्रमाणे चॅटमध्ये प्रोफाईलवर रिंग असते आणि त्यावर टॅप करून, तुम्ही इतर वापरकर्त्यांची स्टोरी पाहू शकतात, त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅपचे हे फीचर काम करेल. कंपनीने हे स्टेटस फीचर 2017 मध्ये लाँच केले होते, ज्याला आता अपडेट मिळणार आहे.
IOS वरून Android वर चॅट ट्रान्सफर
व्हॉट्सअॅपने अलीकडेच फीचर लॉंच केले आहे ज्यामध्ये वापरकर्ते सहजपणे त्यांच्या आयओएस सिस्टीमवरुन त्यांची व्हॉट्सअॅप चॅट्स अँड्रॉइडवर ट्रान्सफर करू शकतील. जर तुम्ही देखील आयफोनवरून अँड्रॉइड फोनवर स्विच करत असाल, तर तुम्हाला चॅट ट्रान्सफर करण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्सची मदत घ्यावी लागत असे लागला. याचसोबत आणखी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असे, पण आता व्हॉट्सअॅपकडून वापरकर्त्यांना ही सुविधा देणार आहे. Samsung Galaxy Unpacked कार्यक्रमात व्हॉट्सअॅपने याची घोषणा केली आहे. सर्वप्रथम सॅमसंग वापरकर्ते त्यांच्या आयफोनच्या चॅट्स सहज ट्रान्सफर करू शकतील. या इव्हेंटमध्ये लॉन्च झालेल्या सॅमसंगच्या फोल्डेबल फोनवरून त्याची सुरुवात होईल. कंपनीने आपल्या घोषणेत म्हटले आहे की, जर तुम्हाला मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम स्विच करायची असेल तर व्हॉट्सअॅप तुमच्या व्हॉइस नोट्ससह संपूर्ण चॅट सुरक्षितपणे ट्रान्सफर करू शकेल. या फीचरचा हेतू असा आहे की, वापरकर्ते त्यांच्या पसंतीच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये चॅटसह सहजपणे स्विच करू शकतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.