Innova ची नवीन गाडी पेट्रोलवर नाही तर या खास इंधनावर धावणार! नितीन गडकरींच्या हस्ते या तारखेला होणार लाँच

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुढील आठवड्यात इथेनॉल इंधनावर चालणारी कार सादर करणार असल्याची माहिती दिली आहे.
Innova
Innova sakal
Updated on

टोयोटाच्या प्रसिद्ध MPV इनोव्हा चा नवा अवतार लवकरच लॉन्च होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे नवीन इनोव्हा लाँच करणार आहेत. ही नवीन टोयोटा इनोव्हा नेहमीच्या पेट्रोलऐवजी प्युअर इथेनॉलवर धावेल.

नितीन गडकरी म्हणाले की 29 ऑगस्ट रोजी ते 100 टक्के इथेनॉलवर चालणारी नवीन इनोव्हा कार लॉन्च करणार आहेत. वाहन उत्पादकांना पर्यायी इंधनावर चालणारी आणि हिरवी वाहने आणण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या केंद्रीय मंत्री यांनी गेल्या वर्षी हायड्रोजनवर चालणारी टोयोटा मिराई ईव्ही ही कार लॉन्च केली होती.

येथे मिंट सस्टेनेबिलिटी शिखर परिषदेला संबोधित करताना गडकरी म्हणाले, " लोकप्रिय (टोयोटा) इनोव्हा कार मी 29 ऑगस्ट रोजी लॉन्च करणार आहे, जी कार 100 टक्के इथेनॉलवर चालेल." ही कार जगातील पहिली BS-6 (स्टेज-2) विद्युतीकृत फ्लेक्स-इंधन आधारित वाहन असेल.

Innova
Car Safety : तुमची कार किती सुरक्षित? देशभरात लवकरच सुरू होईल टेस्टिंग अन् त्यानुसार असेल सेफ्टी स्टार रेटिंग

इथेनॉल इंधनाचे फायदे:

इथेनॉल इंधनाच्या वापरामुळे पर्यावरणाचा फायदा तर होईलच शिवाय वाहन चालवण्यासाठी लोकांच्या खिशावरचा भारही कमी होईल. सध्या देशातील अनेक भागांत पेट्रोल-डिझेलचे दर १०० रुपयांच्या आसपास आहेत, तर इथेनॉलची किंमत अवघी ६३ ते ४० रुपये प्रतिलिटर आहे.

अशा प्रकारे, ते पारंपारिक इंधन डिझेल आणि पेट्रोलच्या तुलनेत सुमारे 40 रुपयांनी स्वस्त आहे. ते पेट्रोलच्या तुलनेत 50 टक्के कमी प्रदूषण पसरवते. पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉल वापरताना मायलेज थोडे कमी होते, पण तरीही मोठी बचत होते.

पंतप्रधानांनी E20 इंधन लाँच केले होते:

इथेनॉलच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र, नितीन गडकरी जी कार लॉन्च करणार आहेत ती शंभर टक्के इथेनॉलवर चालणार आहे. परंतु यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरूमध्ये E20 इंधन लाँच केले होते, जे 20% इथेनॉलसह मिश्रित पेट्रोल आहे. "E20" 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के गॅसोलीनचे मिश्रण दर्शवते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()