BS-6 वाहने रस्त्यावर येताच बंधनकारक असेल 'हा' नियम

bs 6 vehicle rule
bs 6 vehicle rule
Updated on

नवी दिल्ली, ता. 10 : केंद्र सरकार सध्या बीएस 6 वाहनांसाठी तयारी करत आहे. नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक योजनाही सरकार राबवणार आहे. रस्त्यावर बीएस 6 गाड्या ओळखता याव्यात यासाठी त्यांच्या नंबर प्लेटवर खास रंगाची पट्टी लावण्यात येणार आहे. हिरव्या रंगाची ही पट्टी असेल. नंबर प्लेटवर हिरवी पट्टी असल्यास टोलनाक्यासह रस्त्यावर वाहने चालवताना अनेक ठिकाणी सूट देण्याचा सरकारचा विचार आहे. बीएस 6 वाहनांच्या नंबर प्लेटला हिरवी पट्टी न लावल्यास रजिस्ट्रेशनपासून रस्त्यावर असलेल्या चेकिंगवेळीही वाहनधारकांना त्रास होऊ शकतो. 

देशात बीएस 6 वाहनांना एक सेंटीमीटरची हिरवी आणि नारंगी पट्टी लावावी लागेल. सरकारने अशा वाहनांवर एक सेंटीमीटरचे हिरवे स्टीकर लावणं बंधनकारक केलं आहे. हा आदेश एक ऑक्टोबर 2020 पासून लागू होईल. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने याबाबत अध्यादेश जारी केला आहे. हिरवी पट्टी नंबर प्लेटवर जिथं पेट्रोल सीएनजी किंवा डिझेल वाहनांसाठी वेगळ्या रंगाची पट्टी असते तिथं लावण्यात येणार आहे.

सरकारच्या आदेशानुसार नंबर प्लेटवर बीएस 6 वाहन ओळखणारी पट्टी लावली नाही तर गाडीचे रजिस्ट्रेशन होणार नाही. तसंच रस्त्यावर वाहने चालवताना चेकिंगवेळी अडचण येऊ शकते. जर बीएस 6 वाहनावर हिरव्या रंगाची पट्टी लावली तर तुम्हाला अनेक ठिकणी सूट मिळेल. रस्त्यावर प्रदुषण तपासणी करण्यात येते त्यापासून तुम्ही वाचाल. बीएस 6 वाहने महाग असल्यानं सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारे ऑफर दिल्या जात आहेत. 

बीएसचा संबंध एमिशन स्टँडर्डशी आहे. बीस म्हणजे भारत स्टेज असून यामुळे गाडी किती प्रदुषण करते हे समजतं. बीएसच्या माध्यमातून गाड्यांच्या इंजिनमधून निघणाऱ्या धुरामुळे होणाऱं प्रदुषण रेग्युलेट केलं जातं. बीएस नंतर असलेल्या नंबरवरून इंजिन किती प्रदुषण पसरवतं ते ठरवलं जातं. यामध्ये नंबर जसा वाढेल तसं प्रदुषण कमी होणारं इंजिन असतं. यानुसार भारतात बीएस 3, बीएस 4, बीएस 6 गाड्या आहेत. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()