भारतात आधार कार्ड हे आवश्यक कागदपत्र बनले आहे त्याशिवाय देशात कोणतेही काम होऊ शकत नाही. UIDAI सुद्धा आधारशी संबंधित माहिती वेळोवेळी देते. दरम्यान सरकारने आधार व्हेरिफिकेशन बद्दल नवा नियम जारी केला आहे. हा नवा नियम आधारच्या ऑफलाइन व्हेरिफिकेशन बाबत आहे. आता नवीन नियमानुसार, वापरकर्ते तुमच्या आधारचे ऑफलाइन किंवा ऑनलाइन व्हेरिफिकेशन करु शकणार आहेत.
सरकारचे नवीन नियम
सरकारने आधार (प्रमाणीकरण आणि ऑफलाइन व्हेरिफिकेशन) नियमावली, 8 नोव्हेंबर 2021 रोजी अधिसूचित केले आहे आणि 9 नोव्हेंबर 2021 रोजी अधिकृत वेबसाइटवर ती जारी केली आहे. यामध्ये ई-केवायसी (e-kyc) साठी आधारच्या ऑफलाइन व्हेरिफिकेशनची तपशीलवार प्रक्रिया सांगण्यात आली आहे.
सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार, आता तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी डिजिटल स्वाक्षरी असलेले दस्तऐवज द्यावे लागणार आहेत. हे डिजिटल स्वाक्षरी केलेले दस्तऐवज यूनीक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केलेले असावेत, या डॉक्युमेंटवर यूजरच्या आधार क्रमांकाचे शेवटचे चार क्रामांक दिलेले असतील
सरकारने जारी केलेल्या नवीन नियमानुसार, आधार धारकांना व्हेरिफिकेशनसाठी ऑफलाइन ई-केवायसी कोणत्याही अधिकृत एजन्सीला देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. यानंतर एजन्सी आधार धारकाने दिलेला आधार क्रमांक आणि नाव, पत्ता इत्यादी केंद्रीय डेटाबेसशी जुळवून पाहिल. जुळणी बरोबर असल्याचे आढळल्यास व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पुढे नेली जाते.
आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी म्हणजे डिजिटल स्वाक्षरी असलेले डॉक्यूमेंट जो UIDAI द्वारे जारी केला जातो. या डॉक्यूमेंटमध्ये तुमच्या आधार क्रमांकाचे शेवटचे चार अंक, नाव, लिंग, पत्ता, जन्मतारीख आणि फोटो यांची माहिती दिली जाते. सरकारने जारी केलेला हा नवीन नियमानुसार आधार धारकांनी व्हेरिफीकेशन एजन्सीला दिलेला कोणताही ई-केवायसी डेटा ती एजन्सी साठवून ठेऊ शकत नाही.
ऑफलाइन आधार व्हेरिफिकेशनचे प्रकार
नियमांनुसार, UIDAI खालील प्रकारच्या ऑफलाइन व्हेरिफिकेशन सेवा देईल
- QR कोड व्हेरिफिकेशन
- आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी व्हेरिफिकेशन
- ई-आधार व्हेरिफिकेशन
- ऑफलाइन पेपर आधारित व्हेरिफिकेशन
आधार व्हेरिफिकेशनची पद्धती
ऑनलाइन आधार व्हेरिफिकेशनसाठी धारकांकडे इतर अनेक सिस्टीम्स आहेत.
- डेमोग्राफिक ऑथेंटिकेशन
- एक-वेळ पिन आधारित ऑथेंटिकेशन
- बायोमेट्रिक आधारित ऑथेंटिकेशन
- मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.