SIM Card : सिम कार्डसाठी आता हा नियम लागू होणार; एवढ्याच दिवसांची आहे मुदत

पुढील १५ दिवसांत हा नियम लागू होणार असून याद्वारे फसवणूक रोखण्याचा उद्देश आहे.
SIM Card
SIM Card google
Updated on

मुंबई : सर्व दूरसंचार वापरकर्त्यांसाठी दूरसंचार विभागाने एक नवीन नियम जारी केला आहे. Jio, Airtel, Vodafone-Idea आणि BSNL-MTNL वापरकर्त्यांसाठी नवीन नियम आणले आहेत.

नवीन सिम कार्ड सक्रिय झाल्यानंतर 24 तासांसाठी बंद राहील. म्हणजेच सिम सक्रिय झाल्यानंतर 24 तासांसाठी इनकमिंग, आउटगोइंग आणि एसएमएसची सुविधा बंद राहणार आहे. पुढील १५ दिवसांत हा नियम लागू होणार असून याद्वारे फसवणूक रोखण्याचा उद्देश आहे. हेही वाचा - वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

SIM Card
सिम कार्डबाबत नवी नियमावली; या लोकांना सिम घेता येणार नाही

फायदा काय ?

नवीन सिम किंवा अपग्रेडसाठी विनंती केली गेली आहे किंवा नाही हे सिम सक्रिय झाल्यानंतर 24 तासांच्या आत ग्राहकाची पडताळणी केली जाईल. ग्राहकाने नवीन सिमची विनंती नाकारल्यास ते सक्रिय केले जाणार नाही.

फसवणूक रोखण्यास मदत होईल

सध्या ग्राहकाची वैयक्तिक माहिती चोरणे खूप सोपे झाले आहे. फसवणूक करणाऱ्यांना नवीन सिम दिले जाते, त्यानंतर ग्राहकाच्या नकळत जुने सिम बंद केले जाते. नवीन सिममधून ओटीटी मिळवून आर्थिक फसवणूक केली जाते.

SIM Card
SIM Card : आता सहजासहजी मिळणार नाही सिम कार्ड; हीच कागदपत्रे ठरतील वैध

फसवणूक रोखण्यासाठी उपाययोजना

देशात डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ नोंदवली जात आहे. यासोबतच आर्थिक फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. सिम स्वॅपिंगच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटना घडतात. अशा परिस्थितीत, सरकारने सर्व टेलिकॉम कंपन्यांना सिम सक्रिय करण्यासाठी २४ तासांच्या आत नवीन सिम लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.