New Rules From 1st January 2023: आजपासून नवीन वर्ष सुरू झाले आहे. आजपासून काही नियम देखील बदलणार आहेत, ज्याविषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. व्हॉट्सअॅप, गुगल क्रोम आणि ऑनलाइन पेमेंट सारख्या सर्व्हिसेसमध्ये आजपासून बदल होणार आहे. या नवीन नियमांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा: Smartphone Offer: ३८ हजारांचा फोन १० हजारात, ५० मेगापिक्सल कॅमेऱ्यासह मिळेल भन्नाट फीचर्स
४९ स्मार्टफोनमध्ये चालणार नाही WhatsApp
नवीन वर्षात जवळपास ४९ स्मार्टफोनमध्ये WhatsApp काम करणे बंद करेल. यामध्ये अँड्राइड स्मार्टफोनपासून ते आयफोनचा समावेश आहे. ज्या फोनमध्ये आउटडेटेड ऑपरेटिंग सिस्टम आहे, त्या डिव्हाइसमध्ये WhatsApp काम करणे बंद करेल. फोनमध्ये आधीपासूनच WhatsApp असल्यास काही दिवस वापर करता येईल. परंतु, तुम्हाला नवीन फीचर्सचा फायदा मिळणार नाही.
लॅपटॉपमध्ये चालणार नाही गुगल क्रोम
तुमचा लॅपटॉप अथवा डेस्कटॉप विंडोज ७ आणि विंडोज ८.१ व्हर्जनवर काम करत असल्यास गुगल क्रोम वापरता येणार नाही. गुगल वर्ष २०२३ मध्ये विंडोज ७ आणि विंडोज ८.१ व्हर्जनला क्रोम सपोर्ट देणे बंद करेल. लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम वापरण्यासाठी विंडोज अपडेट करा.
बंद होणार गुगलची सर्व्हिस
नवीन वर्षात गुगल आपली गेमिंग सर्व्हिस Stadia ला बंद करणार आहे. या क्लाउड गेमिंग सर्व्हिसला १९ नोव्हेंबर २०१९ मध्ये लाँच केले होते. लोकप्रियता कमी झाल्याने गुगलने ही सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सर्व्हिस १८ जानेवारीपर्यंत सुरू राहील.
तुम्ही जर ऑनलाइन खरेदीसाठी कार्डचा वापर करत असाल तर या नियमात बदल होणार आहे. १ जानेवारीपासून कार्ड नंबर आणि एक्सपायरी डेट सारखी कार्डची माहिती गुगलवर सेव्ह करता येणार नाही. तुम्हाला दरवेळी ऑनलाइन व्यवहार करताना ही माहिती पुन्हा भरावी लागेल. आरबीआयने ऑनलाइन पेमेंटला सुरक्षित बनवण्यासाठी नियमावली जारी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.