New SUV Under 10 Lakh Rupees : एसयूव्ही प्रेमींसाठी आनंदाची बातमी, 10 लाखांच्या आत खरेदी करता येणार एसयूव्ही

एसयूव्ही प्रेमींसाठी आगामी दिवस खास असणार
New SUV Under 10 Lakh Rupees
New SUV Under 10 Lakh Rupeesesakal
Updated on

New SUV Under 10 Lakh Rupees : एसयूव्ही प्रेमींसाठी आगामी दिवस खास असणार आहेत. ज्या लोकांना १० लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत चांगली एसयूव्ही खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी यावर्षी ५ नवीन एसयूव्ही येत आहेत. यात सर्वात आधी मारुती सुझुकीची नवीन मायक्रो एसयूव्ही फ्राँक्स आहे.

New SUV Under 10 Lakh Rupees
Seatbelt In Auto Rickshaws : आता रिक्षातही लावावा लगणारा सीटबेल्ट

यानंतर टाटा मोटर्स आपली पहिली सीएनजी एसयूव्ही पंच सीएनजी सोबत टॉप सेलिंग एसयूव्ही नेक्सॉनचे फेसलिफ्टेड मॉडल सुद्धा लाँच करण्यात येणार आहे. या सर्वा सोबत किआ आणि टोयोटा सारखी कंपनी सुद्धा सब ४ मीटर एसयूव्ही सेगमेंट मध्ये नवीन एसयूव्ही आणणार आहे.

New SUV Under 10 Lakh Rupees
Apple Offline Store : 'या' प्लॅटफॉर्मवर अॅपल स्टोअरपेक्षाही स्वस्त मिळणार आयफोन

मारुती सुझुकी फ्राँक्स

मारुती सुझुकी पुढील महिन्यात आपली पहिली मायक्रो एसयूव्ही फ्राँक्सच्या किंमतीचा खुलासा करणार आहे. आपल्या सेगमेंटची टॉप सेलिंग कार टाटा पंचशी टक्कर देण्यासाठी फ्राँक्सची सुरुवातीची किंमत ७ लाख रुपये असू शकते. लूक आणि फीचर्स मध्ये मारुती फ्राँक्स खूपच शानदार आहे. फ्राँक्सची ३ महिन्याहून जास्त आधीपासून बुकिंग सुरू आहे. याला चांगला रिस्पॉन्स सुद्धा मिळत आहे.

New SUV Under 10 Lakh Rupees
Kia EV6 : इलेक्ट्रिक कार घ्यायचा विचार करत असाल तर किआ ईव्ही 6 ठरेल बेस्ट ऑप्शन

टाटाच्या दोन नवीन एसयूव्ही येणार

टाटा मोटर्सने यावर्षी ऑटो एक्सपो मध्ये आपली पंच सीएनजीला आणले होते. आता आगामी काळात याला लाँच केले जाणार आहे. अल्ट्रोज सीएनजी नंतर टाटाची पुढील सीएनजी कार पंच सीएनजी असणार आहे. याची सुरुवातीची किंमत ८ लाख रुपये असू शकते. यासोबत टाटा यावर्षी आपली सर्वात जास्त विकणारी एसयूव्ही नेक्सॉनला खूप साऱ्या अपडेट सोबत नेक्सॉन फेसलिफ्ट म्हणून आणू शकते.

New SUV Under 10 Lakh Rupees
Samruddhi Highway Route : समृद्धी महामार्गावर मिळणार केवळ याच वाहनांना प्रवेश

किआ आणि टोयोटाची एसयूव्ही

किआ मोटर्स लवकरच आपल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही सॉनेटला अपडेट करण्याच्या तयारीत आहे. यात खूप काही कॉस्मेटिक आणि मॅकेनिकल बदल पाहायला मिळू शकतात. कंपनी याला नेक्सॉन, ब्रेझा आणि वेन्यू सारख्या एसयूव्हीशी टक्कर करणार आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर इंडिया सुद्धा यावर्षी सब ४ मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंट मध्ये आपली नवीन एसयूव्ही लाँच करू शकते. सध्या कंपनीची अर्बन क्रूझर कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंट मध्ये आपली स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.