Bio Gas Project : बायोगॅस प्रकल्पातून मिळणार शुद्ध पाणी ; पुण्यातील शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांचे संशोधन

बायोगॅस प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञान वापरून दररोज एक हजार ते एक लाख लिटर पाण्याची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान पुण्यातील शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांनी विकसित केले आहे. आपल्या संशोधनाची माहिती देताना मुखर्जी म्हणाले, की ओल्या कचऱ्यापासून खत आणि ऊर्जा निर्मितीसाठी बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येतात.
Bio Gas Project
Bio Gas Projectsakal
Updated on

पुणे : बायोगॅस प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञान वापरून दररोज एक हजार ते एक लाख लिटर पाण्याची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान पुण्यातील शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांनी विकसित केले आहे. आपल्या संशोधनाची माहिती देताना मुखर्जी म्हणाले, की ओल्या कचऱ्यापासून खत आणि ऊर्जा निर्मितीसाठी बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येतात. मात्र याच प्रकल्पामधून उर्जेबरोबरच आपल्याला पाणीही मिळू शकते. बायोगॅस एक हायड्रोकार्बन आहे.

यामध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोजन असतो. आपण जेव्हा बायोगॅस पेटवतो, तेव्हा ठरावीक तापमानानंतर यातील हायड्रोजन ऑक्सिजनच्या संपर्कात येऊन पाणी तयार होते व वाफेच्या रूपात वर उडून जाते. अशा वेळी चिमणीच्या तोंडाशी हे वॉटर रिकव्हरी युनिट वापरल्यास पिण्यायोग्य पाणी मिळू शकते. एक किलो बायोगॅसपासून दोन लिटर पाणी तयार होऊ शकते, असा दावा त्यांनी गुरुवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत केला.

यावेळी ‘व्हीजीटीआय’मधील अभियंता रोहिणी खारकर, स्थापत्य अभियंता श्रुणाली आपटे, ‘सीओईपी’मधील अभियंता सुभाष गुप्ते, आयआयटी मुंबईचे वैमानिक अभियंता मिलिंद पालकर, डाऊ केमिकलचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. मनोज खारकर उपस्थित होते.

‘ग्रामीण भागातील प्रश्न सुटेल’

बायोगॅस प्रकल्पातून शुद्ध पाणी मिळते हे एक सिद्ध झालेले तंत्रज्ञान असून, उत्तर अमेरिकेत ४८ वर्षांपूर्वी ते वापरण्यात आले आहे. तसेच २००३ मध्ये तंत्रज्ञानाच्या शोधासाठी मला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले आहे. ‘नॅशनल बायोगॅस मॅनेजमेंट प्रोग्रॉम’ या योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात १० लाख बायोगॅस प्रकल्प उभारले जात आहेत. त्यापैकी काही प्रकल्प सुरू देखील झाले आहेत. मात्र आगामी प्रकल्प उभारताना जर सरकारने हे वॉटर रिकव्हरी युनिट त्यात बसविल्यास ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. तसेच हे उपक्रम तयार करण्यासाठी उद्योग उभा केल्यास ग्रामीण भागातील युवकांना रोजगार देखील उपलब्ध होईल. शिवाय उपकरणाला देखभालीची गरज नाही, असे मुखर्जी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.