Instagram Ads : इंस्टाग्रामवर जबरदस्ती बघाव्या लागणार जाहिराती? युजर्सना नाराज करून कंपनीची मोठी घोषणा

Instagram’s Ad Breaks : नव्या फीचरमध्ये काही सेकंदांचा Compulsory Ad काउंटडाउन टायमर
Instagram's Shift to Unskippable Ads: User Backlash and Platform Implications
Instagram's Shift to Unskippable Ads: User Backlash and Platform Implicationsesakal
Updated on

Instagram : अनेक सोशल मीडिया अँप्सवर आपल्याला जाहिराती बघाव्या लागतात. पण आता इंस्टाग्रामवर लवकरच तुम्हाला जाहिराती पाहायला भाग पाडले जाऊ शकते. होय, तुम्ही वाचालं ते बरोबर. सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे की, इंस्टाग्राम वापरण्याचा अनुभव बदलून जाण्याची शक्यता आहे. कारण कंपनी अशा जाहिरातींची चाचणी करत आहे ज्या तुम्ही टाळू शकणार नाही आणि जबरदस्ती बघाव्या लागतील.

या नव्या फीचरमध्ये काही सेकंदांचा काउंटडाउन टायमर असेल. तो संपेपर्यंत तुम्हाला जबरदस्ती जाहिरात पाहावी लागेल. म्हणजेच स्क्रॉल करून पुढे जाणंही अशक्य होणार आहे. हे फीचर यूट्यूबच्या मोफत आवृत्तीसारखंच आहे जिथे व्हिडीओच्या आधी किंवा दरम्यान जाहिराती पाहायलाच हवेत.

Instagram's Shift to Unskippable Ads: User Backlash and Platform Implications
AI Teacher : या AI शिक्षिकेने जिंकलं विद्यार्थ्यांचं मन ; निती आयोगाचा प्रकल्प आसाममध्ये लाँच

वापकरांच्या प्रतिक्रिया मात्र नकारात्मक आहेत. अनेकांनी या जबरदस्ती जाहिरातींना "बोंकर्स" (वेडेपणा) असे म्हटले आहे. यामुळे वापरकर्ते कमी होण्याची शक्यता आहे. सध्या तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या इंस्टाग्रामवर वापरकर्ते जाहिरातींशिवाय स्क्रॉल करण्याची सवय असल्याने ते या बदलावर नाराज होतील. त्यामुळे ते कदाचित इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे वळतील ज्या जाहिरातींविना मजेदार अनुभव देतात.

फायदाही होऊ शकतो. मात्र, या जबरदस्ती जाहिरातींमुळे कंपनीला मात्र फायदा होऊ शकतो. कारण जाहिरातदाते जर जाहिरात पूर्णपणे पाहतील तर त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल. यामुळे जाहिरात दाखवण्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिळणारा जास्तीत जास्त नफा हा इंस्टाग्रामच्या विकासात गुंतवला जाऊ शकतो आणि वापरकर्त्यांना नवे फीचर्स मिळू शकतात.

Instagram's Shift to Unskippable Ads: User Backlash and Platform Implications
NASA Space Mission : सुनीता विल्यम पुन्हा अंतराळात झेप घेण्यासाठी सज्ज ; बाईंग स्टार लाईनचे उद्या पुनःप्रक्षेपण

पण, एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. जास्त नफा मिळवण्याच्या नादात वापरकर्ते कमी झाले तर? म्हणूनच कंपनीने जाहिरातींचा फायदा आणि वापरकर्ते कमी होण्याचा धोका यांच्यात समतोल साधणे गरजेचे आहे. जसे यूट्यूब प्रीमियम आहे तसेच जाहिराती न पाहण्यासाठी एखादे सबस्क्रिप्शन मॉडेल कंपनी आणू शकते.

एकूणच, वापरकर्त्यांचा अनुभव खराब होण्याची शक्यता असली तरी कंपनीला फायदा होऊ शकतो. पण याचा अंतिम निर्णय कंपनीवर अवलंबून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.