बापरे चार्जरद्वारे हॅकींग? 'नो ओटीपी, नो लिंक' अन् १६ लाख रुपये गायब

Mobile Charger Hack
Mobile Charger HackSakal Digital
Updated on

हैदराबाद : मोबाईल बँकींग आणि ऑनलाईन सुविधांमुळे माणसाचं जीवन अत्यंत सुकर झालं आहे. घरच्या घरी लाखोंचे व्यवहार करता येतात. ऑनलाईन प्रक्रियाही सोपी असल्याने वेळ वाचतो. सरकारी धोरण आणि युजर फ्रेंडली तंत्रज्ञान यामुळे देशात ऑनलाईन व्यवहार वाढले. मात्र आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे तोटेही समोर येत असून अनेकांना घरबसल्या नकळत लाखोंचा चुना लागत आहे. हैदराबाद मधील ऑनलाईन फसवणुकीच्या एका प्रकरणात मोबाईल चार्जरचा वापर केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Cyber crime news in Marathi)

Mobile Charger Hack
Vivo कंपनीचा सगळ्यात स्वस्त फोन लाँच, Dual कॅमेरा सेटअपसह, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

हैदराबादमधील खासगी कंपनीतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या खात्यातून 16 लाख रुपये काढण्यात आले. हा प्रकार अधिकाऱ्याच्या लक्षात आला. मात्र, ना त्याला ओटीपी आला होता ना कोणतीही लिंक. संबंधित अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारीची कल्पना असल्याने ओटीपी शेअर करण्याचा किंवा लिंकवर क्लिक करण्याची शक्यताही कमीच होती. या प्रकरणाचा पोलिस आणि सायबर तज्ज्ञ तपास करत होते, मात्र ऑनलाईन चोरीचा हा प्रकार कसा घडला, याचे धागेदोरे समोर येत नव्हते. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करताना काही शंकास्पद हालचाली दिसल्या. यातून तज्ज्ञ संबंधित अधिकाऱ्याच्या मोबाईल चार्जरपर्यंत पोहोचले. अधिकाऱ्याच्या चार्जर बदलण्यात आला होता आणि कॉर्डमध्ये चिप होती, असा दावा केला जातोय. प्रतिक पाटील या ट्विटर युजरने ट्विटरवर हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. (Mobile hacking through USB Charger)

Twitter Screenshot
Twitter ScreenshotSakal Digital

'ज्युस हॅकिंग'ची शक्यता

सायबर तज्ज्ञांच्या मते, मोबाईल चार्जर किंवा यूएसबी कॉर्डमध्ये एक चिप बसवलेली असते. या चिपमध्ये मालवेअर इन्स्टॉल केलेला असतो. याद्वारे तुमच्या मोबाईलमधील संपूर्ण डेटा हॅक केला जातो. हैदराबादमधील अधिकाऱ्याच्या प्रकरणातही याच पद्धतीने बँकेतून पैसे काढले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या बाबत अद्याप पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. ट्विटरवर माहिती शेअर झाल्यानंतर सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल झाला आहे.

Mobile Charger Hack
Tata motors : 'पॉवर ऑफ 6' चे मुंबईत आयोजन

गेम्समधूनही झालेला डेटा हॅक

दोनच दिवसांपूर्वी एक वृत्त आलं होतं, ज्यामध्ये ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या २८ गेम्सच्या माध्यमातून युजर्सची आर्थिक माहिती अर्थात डेटा हॅक झाल्याचं समोर आलं होतं. रॉब्लॉक्स, FIFA, PUBG आणि Minecraft सारख्या लोकप्रिय गेम्सचा या 28 गेम्समध्ये समावेश होता. या गेम्सच्या माध्यमातून मालवेअरद्वारे 3 लाख 84 हजार युजर्सच्या आर्थिक बाबींशी अर्थात अकाउंट नंबर, पासवर्ड, युजरआय़डी संबंधीत डेटा हॅक करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.