Fastag Banks List : आता कुठून घेता येईल नवीन फास्टॅग? NHAI ने प्रसिद्ध केली बँका अन् वित्तसंस्थांची नवी यादी

New Fastag : ज्या ग्राहकांच्या पेटीएम फास्टॅगमध्ये बॅलन्स शिल्लक आहे, ते ग्राहक बॅलन्स संपेपर्यंत त्या फास्टॅगचा वापर करू शकतात. अर्थात, त्यानंतर यूजर्सना नवीन फास्टॅग घ्यावा लागणार आहे.
Fastag Banks List
Fastag Banks ListeSakal
Updated on

NHAI approved list of Banks for Fastag : देशाच्या राष्ट्रीय हायवे अथॉरिटीने फास्टॅगबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्या बँका किंवा वित्तीय संस्था फास्टॅग इश्यू करू शकतात, त्यांची नवी यादी NHAI ने प्रसिद्ध केली आहे. या यादीमधून पेटीएम पेमेंट्स बँकेला बाहेर काढण्यात आलं आहे.

NHAI च्या नव्या यादीमध्ये 39 बँका आणि आर्थिक संस्थांचा (NBFC) समावेश आहे. ग्राहक केवळ या 39 संस्थांमधूनच अधिकृत फास्टॅग मिळवू शकतात. दरम्यान, NHAI ने हे स्पष्ट केलं आहे, की ज्या ग्राहकांच्या पेटीएम फास्टॅगमध्ये बॅलन्स शिल्लक आहे, ते ग्राहक बॅलन्स संपेपर्यंत त्या फास्टॅगचा वापर करू शकतात. अर्थात, त्यानंतर यूजर्सना नवीन फास्टॅग घ्यावा लागणार आहे.

या यादीमध्ये कोणाचा समावेश?

यामध्ये एअरटेल पेमेंट्स बँक, अलाहाबाद बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, अ‍ॅक्सिस बँक, बंधन बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कॉसमॉस बँक, आयडीबीआय बँक, इंडियन बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, येस बँक अशा बँकांचा समावेश आहे.

Fastag Banks List
Fastag: मोठा दिलासा! 'एक वाहन, एक फास्टॅग'ची मुदत मार्च अखेरपर्यंत वाढवली, असे करा केवायसी अपडेट

यासोबतच कर्नाटक बँक, कोटक महिंद्रा बँक, नागपूर नागरी सहकाही बँक, पंजाब महाराष्ट्र बँक, पंजाब नॅशनल बँक, डोंबिवली नागरी सहकारी बँक, फेडरल बँक, फिनो पेमेंट बँक, जे&के बँक, सारस्वत बँक, साऊथ इंडियन बँक, जळगाव पीपल को-ऑफ बँ आणि थ्रिसुर डिस्ट्रिक्ट बँक यांचाही या यादीमध्ये समावेश आहे.

पेटीएम टॉपअप करण्यासाठी मुदत

दरम्यान, ज्यांच्याकडे पेटीएम फास्टॅग आहे, त्यांना आपल्या फास्टॅगमध्ये रिचार्ज टॉपअप करण्यासाठी 15 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यानंतर ही सुविधा बंद करण्यात येईल. टॉपअप केल्यानंतर रिचार्ज संपेपर्यंत तो फास्टॅग वापरता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.