Mobile Repair At Home : रिपेयरिंग सेंटर मध्ये जायची गरज नाही.. घरच्या घरी असा करा फोन दुरुस्त

स्मार्टफोन खराब होताच, सर्व्हिस सेंटर मध्ये जायचा धोशा लावला जातो
Mobile Repair At Home
Mobile Repair At Homeesakal
Updated on

Mobile Repair At Home : स्मार्टफोन खराब होताच, सर्व्हिस सेंटर मध्ये जायचा धोशा लावला जातो. आता एवढ्या धकाधकीच्या जीवनात सर्व्हिस सेंटर मध्ये जाण्यासाठी वेळ कसा काढायचा. मोबाईल हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनल्यामुळे अशा समस्या अनेकांना होतात. यामध्ये काही अडचण आल्यास अनेक कामे रखडतात. मात्र, आता तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. तुमचा फोन दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला सर्व्हिस सेंटर मध्ये जाण्याची गरज नाही. आता फोनच्या किरकोळ समस्या घरबसल्या दूर होतील.

सर्व्हिस सेंटर मध्ये न जाता फोन दुरुस्त होईल हे खरं असलं तरी, पण हे कसं शक्य आहे ? वास्तविक, काही कंपन्या रिमोट सेवा देतात. फोन सॉफ्टवेअर किंवा हँग होण्यासारख्या समस्यांसाठी या कंपन्या तुम्हाला घरबसल्या सेवा देतात. म्हणजे तुम्हाला सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्याची गरज नाही आणि फोन घरीच दुरुस्त होतो. आता ही प्रक्रिया कशी होते ते पाहू.

Mobile Repair At Home
Health Checkup After Age Of 40 : चाळीशीत आवर्जून करा हे 5 हेल्थ चेकअप, डॉक्टर्स देतात खास सल्ला

रिमोट सर्व्हिस : घरी फोन दुरुस्ती

जर तुमचा फोन हँग होत असेल तर तुम्ही रिमोट असिस्टन्स देणाऱ्या कंपनीची सेवा घेऊ शकता. सॅमसंग अशा प्रकारची सेवा प्रदान करते, त्यामुळे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. दूरच्या ऑफिसमध्ये बसलेला कंपनीचा तंत्रज्ञ तुमच्या फोनवर कमांड मिळवतो आणि फोन दुरुस्त करतो. त्याला कुठेही जाण्याची गरज नाही आणि तुम्हालाही नाही.हे सर्व काम ऑनलाइन केलं जातं. त्यासाठी रिमोट सेवेची विनंती करावी लागेल.

Mobile Repair At Home
World Liver Day 2024 : हळद, कॉफीसह ‘या’ गोष्टींचा आहारात करा समावेश; यकृत राहील निरोगी

खाली नमूद केलेल्या गोष्टींमध्ये तुम्हाला समस्या येत असल्यास, तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता.

मेन्यू आणि फीचर्स प्रॉब्लम

गूगल किंवा स्मार्टफोन ब्रँड अकाउंट सेटअप

सॉफ्टवेअर आणि ॲप अपडेट्स

सेटिंग्स मध्ये अडचण

डिस्प्ले इश्यू

Mobile Repair At Home
Health Care News: ‘ही’ लक्षणे दर्शवतात शरीरातील लोहाची कमतरता

ही यंत्रणा अशा प्रकारे काम करते

कंपनीचे तंत्रज्ञ फोनवर ऑनलाइन ॲक्सेस मागतात. तुम्ही ही परवानगी देता तेव्हा फोनचे नियंत्रण त्याच्याकडे जाते. तो तुमचा फोन तपासतो आणि समस्या शोधतो. या काळात तुमच्या गोपनीयतेची पूर्ण काळजी घेतली जाते. जर फोनमध्ये काही समस्या असेल तर तो रिमोट पद्धतीने ती दुरुस्त करू शकतो. मात्र फोनमध्ये हार्डवेअर किंवा काही समस्या असल्यास, तो बदलण्यासाठी तुम्हाला सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.