अनावश्यक ग्रुपमध्ये सामील होण्याचे कसे टाळायचे? तर जाणून घ्या या काही महत्त्वाच्या टिप्स.
आजकाल प्रत्येकजण आपल्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांशी कनेक्ट राहण्यासाठी WhatsApp ग्रुप्स वापरतो. पण तुमच्या परवानगीशिवाय कोणी तुम्हाला कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड केल्यास समस्या वाढतात. अशा परिस्थितीत प्रश्न पडतो, की अनावश्यक ग्रुपमध्ये सामील होण्याचे कसे टाळायचे? तर जाणून घ्या या काही महत्त्वाच्या टिप्स. या टिप्सच्या मदतीने WhatsApp सेटिंग केल्यास तुम्ही स्वत:ला कोणत्याही WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यापासून रोखू शकाल.
पनवानगीशिवाय कोणी तुम्हाला ग्रुपमध्ये सामील करू नये यासाठी "या' स्टेप्स फॉलो करा...
प्रथम WhatsApp ओपन करा
वर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा
सेटिंग्जमध्ये जा आणि अकाउंटवर टॅप करा
"प्रायव्हसी'वर जा आणि ग्रुप ऑप्शनवर टॅप करा
येथे तुम्हाला Every, My Contacts आणि My Contacts Except हा पर्याय मिळेल
या तिन्हीपैकी My Contacts Except हा पर्याय निवडा
आता ते संपर्क क्रमांक येथे निवडा, जे तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करू शकतील. यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही तुम्हाला कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड करू शकणार नाही.
लवकरच येत आहे हे उत्कृष्ट फीचर
जगभरातील मोठे मेसेजिंग ऍप WhatsApp अनेक दिवसांपासून त्याच्या यूजर्ससाठी मेसेज रिऍक्शन या खास फीचरवर काम करत आहे. iOS च्या बीटा व्हर्जनवर नुकतेच हे फीचर दिसले. आता हे फीचर अँड्रॉईड बीटा व्हर्जनवर उपलब्ध आहे. हे फीचर सुरू केल्यामुळे यूजर्स इमोजीच्या माध्यमातून मेसेजवर आपला फीडबॅक देऊ शकतील. येत्या काही दिवसांत हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस यूजर्ससाठी रिलीज केले जाईल, अशी अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.