Google Help me Write : आता मेल लिहिण्याचं टेंशन नाही, Gmail टाईप करेल तुमच्यासाठी मेल
अनेकांना एखाद्या महत्वाच्या मेलला रिप्लाय देताना त्यात नेमकं काय लिहावं. तसचं एखादा ऑफिशियल मेल असेल किंवा एखादा सर्व्हिससंबंधी मेल Email. अशा मेलला उत्तर काय द्यावं हे माहित असलं तरी ते इंग्रजीत योग्य प्रकारे मांडताना अनेकांना घाम फुटतो. मात्र आता लवकरच तुमचं इमेल लिहण्याचं टेन्शन दूर होणार आहे. कारण जीमेलचं Gmail तुम्हाला तुमचा रिप्लाय लिहिण्यासाठी मदत करणार आहे. No Tension to Reply to email now gmail will assist you
नुकत्याच पार पडलेल्या Googleच्या वार्षिक इव्हेंटमध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी गुगलच्या Google एका नव्या फिचरची New Feature घोषणा केली आहे. गुगल लवकरच आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सुसज्ज असं Help me Write हे नवं फिचर लॉन्च करणार आहे. यामुळे युजर्सना गुगलच्या मदतीने मेल Email लिहणं तसचं गुगल डॉक्सवर काम करणं सोपं होणार आहे.
सध्या हे फिचर प्रायोगिक तत्वावर काही मोजक्या युजर्ससाठी उपलब्ध आहे. मात्र लवकरच Help me Write हे फिचर सर्व युजर्ससाठी लॉन्च करण्यात येईल. हे फिचर उपलब्ध झाल्यानंतर Gmail आणि Google Docs मध्ये या फिचरच्या एका नव्या आयकाॅनची भर पडेल. या फिचरच्या मदतीने तुम्हाला मेल किंवा एखादा मथळा लिहण्यास गुगल मदत करणार आहे.
असं काम करेल Help me Write फिचर
Gmail आणि Google Docsमध्ये गुगुल ओन्ड AI सपोर्टचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामुळे जीमेल स्वत: एखाद्या मेलला रिप्लाय देऊ शकेल. अर्थात युजरला त्याला मेलमध्ये काय लिहायचं आहे याची थोडक्यात माहिती AI ला द्यावी लागेल. युजरच्या माहितीच्या आधारे एआय मेल लिहेल अर्थात यात युजर त्याला हवे तो बदल करू शकतो. यासाठी तुम्हाला....
Gmail ओपन करावं लागेल.
Compose मेलच्या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर Send पर्यायाच्या शेजारी तुम्हाला एखाद्या पेनसारखं दिसणारं आयकाॅन दिसेल. हे आयकाॅन Help me Write या फिचरचं आहे. यावर क्लिक करा.
हे देखिल वाचा-
Help me Write वर क्लिक केल्यानंतर एक छोटा बॉक्स ओपन होईल. यात तुम्हाला मेलमध्ये काय लिहायचं आहे हे थोड्यात लिहा. उदाहरण घ्यायचं झालं तर Cancel my bus ticket किंवा I need leave for vacation.
यानंतर 'क्रिएट'वर क्लिक केल्यानंतर AI तुमच्यासाठी एक मेल तयार करेल. हा पूर्णपणे तयार करण्यात आलेला मेल वाचून तुम्ही त्यात बदल करु शकता.
त्यानंतर हा संपूर्ण मथळा तुमच्या मेलमध्ये Insert करण्यासाठी क्लिक करा.
पुढे हा मेल तुम्ही सेंड करू शकता. अर्थाच हे फिचर सर्व युजर्ससाठी लॉन्च झालं नसल्याने सगळ्याच युजर्सना Help me Write चा पर्याया दिसणार नाही. मात्र लवकरच हे फिचर सर्वांसाठी सुरू होणार आहे.
Google Docs साठी हेल्प मी राइट फिचर
गुगगल डॉक्युमेंटसाठी देखील तुम्हाला हे फिचर मदत करेल. यासाठी तुम्हाला
Google Docs मध्ये जाऊन new Document पर्याय निवडायचा आहे.
पेज खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला Help me Write पर्याय दिसेल यावर क्लिक करा
त्यानंतर आलेल्या बॉक्समध्ये तुम्हाला ज्या विषयावर लिहायचं आहे त्याचा कन्टेट किंवा थोडक्यात माहिती द्या.
त्यानंतर क्रिएटवर क्लिक करा.
तुमच्यासाठी गुगुल कंटेंट तयार करून देईल. या कंटेंटमध्ये तुम्ही बदल करू शकता. तसचं यामध्ये तुम्हाला कंटेंट पुन्हा क्रिएट करण्याता पर्यायही मिळतो.
हे देखिल वाचा-
Help me Write फिचरचे फायदे
या नव्या फिचरमुळे युजर्सना अनेक फायदे होणार आहेत.
युजर्सचा मेल लिहण्याचा वेळ वाचणार आहे. तसचं घाईच्या वेळी कमी वेळेत रिप्लाय देणं शक्य होईल.
तसचं यामुळे अधिक प्रोफेशनल मेल लिहिण्यास मदत होईल.
एवढचं नव्हे तर यामुळे युजरला देखील योग्य ईमेल लिहण्याची कला अवगत होईल.
अशा प्रकारे गुगुलचं हे नवं फिरच अनेकांसाठी वरदान ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.