Nobel Prize 2024 : फिज़िक्समध्ये जॉन जे. हॉपफील्ड आणि जेफ्री ई. हिंटन यांना नोबेल जाहीर; दोघांनी बनवलं अनोखं न्युरल नेटवर्क

Nobel Prize 2024 in Physics awarded to John J. Hopfield & Geoffrey E. Hinton : स्वीडिश रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सेसने 2024 चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जॉन जे. हॉपफील्ड आणि जेफ्री ई. हिंटन यांना प्रदान केले आहे.
Nobel Prize 2024 in Physics awarded to John J. Hopfield & Geoffrey E. Hinton
Nobel Prize 2024 in Physics awarded to John J. Hopfield & Geoffrey E. Hintonesakal
Updated on

Nobel Prize in Physics : स्वीडिश रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सेसने 2024 चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जॉन जे. हॉपफील्ड आणि जेफ्री ई. हिंटन यांना प्रदान केले आहे. या दोघांना मशीन लर्निंगसाठी कृत्रिम न्युरल नेटवर्क विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण शोध आणि आविष्कार केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे.

जॉन हॉपफील्ड यांनी असोसिएटिव्ह मेमरी विकसित केली आहे, जी प्रतिमा आणि इतर प्रकारच्या पॅटर्न्स साठवून ते पुन्हा तयार करू शकते. तर जेफ्री हिंटन यांनी डेटा स्वयंचलितपणे विश्लेषित करण्याची पद्धत शोधली, ज्यामुळे प्रतिमांमधील विशिष्ट घटक ओळखता येतात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात मशीन लर्निंगसाठी या न्युरल नेटवर्कचा वापर केला जातो, ज्यामध्ये मानवी मेंदूची प्रेरणा घेतलेली आहे.

Nobel Prize 2024 in Physics awarded to John J. Hopfield & Geoffrey E. Hinton
Nobel Prize 2024 : यंदाचं नोबेल पारितोषिक मिळवणारे microRNA संशोधन नेमकं आहे तरी काय? अनेक रोगांचे होणार झटपट निदान अन् उपचार

न्युरल नेटवर्कमध्ये, मेंदूतील न्युरॉन्सना नोड्स म्हणून दर्शवले जाते, ज्यांचे विविध मूल्य असते आणि त्या नोड्समध्ये असणाऱ्या कनेक्शनना सिंॅप्सप्रमाणे समजले जाते. हॉपफील्ड आणि हिंटन यांनी 1980 पासून या कृत्रिम न्युरल नेटवर्क्सवर महत्त्वाचे कार्य केले आहे.

काल, अमेरिकेच्या व्हिक्टर अ‍ॅम्ब्रोस आणि गॅरी रूव्हकन यांना औषधशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. या दोघांना मायक्रोRNA आणि त्याच्या जनुक नियंत्रणातील भूमिकेसाठी हा सन्मान देण्यात आला होता.

Nobel Prize 2024 in Physics awarded to John J. Hopfield & Geoffrey E. Hinton
Laddu Mutya Baba: फिरता पंखा हातानं थांबवला अन् लड्डू मुत्त्या बाबाचं भांडं फुटलं; विज्ञानामुळं उलगडलं सत्य,व्हिडिओ पाहा

नोबेल पारितोषिकासोबत 1 मिलियन डॉलर्स (11 मिलियन स्वीडिश क्रोनर) रोख रक्कम मिळते, जी या पारितोषिकाचे संस्थापक अल्फ्रेड नोबेल यांनी ठेवलेल्या निधीतून दिली जाते.

Related Stories

No stories found.