Nokia 105 Classic : नोकीयाने आणला फक्त 999 रुपयांचा जबरदस्त फोन, UPI पेमेंटची आहे सुविधा

या फीचर फोनचे नाव Nokia 105 Classic आहे
Nokia 105 Classic
Nokia 105 Classicesakal
Updated on

Nokia 105 Classic : नोकिया कंपनीची फोन उत्पादक कंपनी एचएमडी ग्लोबलने भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी कमी किमतीत नवा परवडणारा फोन लॉन्च केला आहे. या फीचर फोनचे नाव Nokia 105 Classic आहे, महत्त्वाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, 1000 रुपयांपेक्षा स्वस्त असलेला हा फीचर फोन इन-बिल्ट UPI अॅप्लिकेशनसह येतो.

तुमच्या माहितीसाठी, या फीचर फोनचे चार प्रकार लॉन्च करण्यात आले आहेत. सिंगल सिम, ड्युअल सिम, चार्जर असलेला फोन आणि चार्जरशिवाय फोन. चला आता जाणून घेऊया फोनची किंमत आणि फोनमध्ये दिलेले फीचर्स.

Nokia 105 Classic
Zucchini Health Benefits : भारतीयांच्या हृदयरोगांवर वरदान ठरली इटलीची 'ही' भाजी, वाचा फायदे

नोकिया 105 क्लासिक भारतातील किंमत

नोकियाच्या या मोबाईल फोनची स्टार्टिंग प्राईज 999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा हँडसेट निळ्या आणि काळया रंगात खरेदी करता येईल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाले तर या उपकरणाची विक्री आजपासून सुरू झाली आहे.

Nokia 105 Classic
Health Care News: या सवयी आहेत तुमच्या आरोग्याच्या शत्रू, फिट राहायचे असेल तर आजच करा त्यांना गुडबाय!

नोकिया 105 क्लासिक फीचर

800 mAh बॅटरीसह लॉन्च झालेल्या या फीचर फोनमध्ये अनेक अप्रतिम फीचर्स आहेत. 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉन्च झालेल्या या फीचर फोनमध्ये वायरलेस एफएम रेडिओ आहे, म्हणजेच या डिव्हाइसमध्ये तुम्हाला एफएम ऐकण्यासाठी वायर्ड हेडसेट घालण्याची गरज नाही, तुम्ही इअरफोन न लावताही एफएम ऐकू शकाल.या फीचर फोनमध्ये 800 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी पूर्ण चार्ज केल्यावर तुम्हाला दीर्घकाळ सपोर्ट करेल. कंपनीने हा फोन एका वर्षाच्या रिप्लेसमेंट गॅरंटीसह लॉन्च केला आहे.

Nokia 105 Classic
Dental Health Tips : आता स्माईल करा मोठी; या घरगुती उपायांनी करा दातांवरील किडीची सुट्टी

स्वस्त फोनवरून UPI पेमेंट करा

फोन टिकाऊ बनवण्यासाठी त्याच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय, तुम्हाला या फोनमध्ये इन-बिल्ट UPI अॅप्लिकेशनचा फायदा मिळेल, ज्याच्या मदतीने तुम्ही या फीचर फोनच्या मदतीने UPI पेमेंट सहज करू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.