Nokia 3210 to return : नोकियाचा 3210 हा फीचर फोन आठवतोय? आपल्यापैकी कित्येकांच्या घरातील तो पहिला फोन होता. त्या काळात सर्वात लोकप्रिय हँडसेट असणारा हा फोन कालांतराने गायबच झाला. आता हाच फोन भारतीय मार्केटमध्ये पुन्हा एकदा एंट्री करणार आहे. नोकियाचे स्मार्टफोन बनवणाऱ्या HMD ग्लोबल या कंपनीने याबाबत माहिती दिली.
HMD Global कंपनीने आपल्या एक्स हँडलवरुन पोस्ट करत याबाबत संकेत दिले आहेत. "आज माझा वाढदिवस आहे, एक आयकॉन लवकरच परत येणार आहे" असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबतच नोकिया फोन्स असा हॅशटॅग देखील देण्यात आला आहे. ही पोस्ट कोणत्या मॉडेलबद्दल आहे याची माहिती स्पष्टपणे देण्यात आलेली नाही.
ही पोस्ट कंपनीने 18 मार्च रोजी शेअर केली होती. 18 मार्च 1999 रोजी नोकियाचा 3210 हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. यामुळे, हाच फोन आता नव्या स्वरुपात भारतात पुन्हा येईल असा अंदाज टेकीज वर्तवत आहेत. अर्थात या फोनचं नाव 3210 असेल की अजून काही याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
लीक्समध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, या हँडसेटमध्ये तब्बल 108MP कॅमेरा देण्यात येऊ शकतो. याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. यासोबतच हा फोन कधी लाँच होणार याचीही माहिती कंपनीने दिलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.