Nokia C300 : नोकिया कमी किमतीत घेऊन येतंय दमदार फोन, जाणून घ्या डिटेल्स

nokia c300 may launch with snapdragon 662 soc spotted on geekbench check details
nokia c300 may launch with snapdragon 662 soc spotted on geekbench check details
Updated on

HMD Global च्या मालकीच्या Nokia ने त्यांच्या C सीरीज अंतर्गत नोकिया C12 आणि C12 Plus सह अनेक नवीन फोन लॉन्च केले आहेत. नोकियाचे हे स्मार्टफोन दमदार हार्डवेअर आणि परवडणाऱ्या किंमतीत लाँच केलेत. दरम्यान कंपनी आता त्याच सीरिजच्या स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसरसह नवीन बजेट स्मार्टफोनवर काम करत आहे. हा फोन Nokia C300 असल्याचे म्हटले जात आहे आणि तो अलीकडेच काही मजेशीर फीचर्ससह Geekbench वर दिसून आला आहे.

Nokia C300 हा एक बजेट फोन असेल

Nokia C300 हा HMD Global Nokia C300 नावाने गीकबेंच बेंचमार्किंग साइटवर दिसला आहे. HMD ग्लोबल ही आधुनिक नोकिया स्मार्टफोनची मूळ कंपनी आहे. हा फोन 3GB रॅम आणि Android 12 सह लिस्टेड आहे.

गीकबेंचने ऑक्टा-कोर प्रोसेसर असलेला स्मार्टफोन लीस्ट केला आहे. याच्या प्रोसेसरची कमाला फ्रीक्वेंसी 2.02 GHz आहे आणि बेस फ्रिक्वेंसी 1.80 GHz आहे. यावरून असे म्हणू शकतो की नोकिया C300 स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर सपोर्टसह येऊ शकतो, जो बजेट फोनमध्ये वापरला जाते. या फोनमध्ये Adino 610 GPU देखील आहे.

nokia c300 may launch with snapdragon 662 soc spotted on geekbench check details
Jammu Kashmir Terror Attack : कारगिल युध्दात पिता, मुलाचं पूंछमध्ये बलिदान; आईला म्हणाला होता…

नोकिया C12 प्लस

कंपनीने नुकताच हा फोन भारतात लॉन्च केला आहे. Nokia C12 Plus हा Android 12 (Go Edition) सह एंट्री-लेव्हल फोन आहे. याशिवाय नोकियाच्या या फोनमध्ये 6.3-इंचाचा HD+ डिस्प्ले दिला आहे. Nokia C12 Plus मध्ये Unisoc चा ऑक्टा कोर प्रोसेसर मिळतो. Nokia C12 Plus मध्ये 2 GB RAM सह 32 GB स्टोरेज देखील दिले आहे. Nokia C12 Plus ची किंमत 7,999 रुपये आहे. ही किंमत 2 GB रॅम सह 32 GB स्टोरेज व्हेरिएंटसह येते.

Nokia C12 Plus मध्ये LED फ्लॅश लाइटसह 8-मेगापिक्सलचा ऑटोफोकस रियर कॅमेरा आहे. समोर 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेऱ्यासोबत अनेक फीचर्स उपलब्ध असतील. फोनमध्ये 4000mAh बॅटरी मिळते.

nokia c300 may launch with snapdragon 662 soc spotted on geekbench check details
Viral Video : सामन्यानंतर भरली धोनी मास्तरांची शाळा; हैद्राबादच्या खेळाडूंनी घेतलं ज्ञान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()