Nokia चा पहिला टॅबलेट T20 भारतात लॉंच, पाहा किंमत आणि फीचर्स

Nokia T20
Nokia T20 Sakal
Updated on

Nokia स्मार्टफोन बनवणारी कंपनी HMD ग्लोबलने भारतात आपला नवीन टॅबलेट Nokia T20 लॉन्च केला आहे. या टॅबलेटची किंमत 15,499 रुपयांपासून सुरु होते. Nokia T20 टॅबलेट जागतिक लॉन्च झाल्यानंतर एका महिन्यानंतर भारतात सादर करण्यात आला आहे. Nokia T20 टॅबलेट अगदी नवीन T-Series अंतर्गत लॉन्च करण्यात आला आहे. टॅबलेटमध्ये लॉंग बॅटरी लाइफ असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यात क्रिस्टल क्लिअर 2K स्क्रीन दिली असून तीन वर्षांच्या मंथली सेक्युरिटी अपडेटसह हा टॅबलेट येईल. तसेच, दोन वर्षांसाठी फ्री ऑपरेटिंग सिस्टम (OS) अपग्रेड देखील मिळेल.

किंमत आणि उपलब्धता

Nokia T20 टॅबलेट तीन व्हेरियंटमध्ये येईल. त्याच्या 3GB + 32GB वाय-फाय व्हेरियंटची किंमत 15,499 रुपये आहे. तर 4GB + 64GB वाय-फाय व्हेरियंट 16,499 रुपयांना मिळेल. त्याच वेळी, 4GB RAM + 64GB LTE + Wi-Fi वेरियंटची किंमत 18,499 रुपये आहे. Nokia T20 भारतात ब्लू कलर ऑप्शन मध्ये येईल. हा टॅबलेट तुम्हाला काही ऑफलाइन रिटेल स्टोअर्स आणि Nokia.com वरून आजपासूनच खरेदी करता येईल. तर फ्लिपकार्टवर विक्री उद्यापासून म्हणजेच २ नोव्हेंबरपासून सुरू होईल.

फीचर्स काय आहेत?

Nokia T20 टॅबलेटची स्क्रीन साइज 10.4 इंच आहे. स्क्रीन रिझोल्यूशन 1200/2000 पिक्सेल आहे. त्याची पीक ब्राइटनेस 400nits आहे. हे Toughened Glass सपोर्टसह येते. यात 512GB मायक्रोएसडी कार्ड स्लॉट दिला असून Nokia T20 टॅबलेट 8MP रियर कॅमेरा, ऑटो फोकस कॅमेरा, LED फ्लॅश लाईट सपोर्टसह येतो. तर फ्रंटला तुम्हाला 5MP कॅमेरा देण्यात आला आहे. हे Android 11 ऑपरेटिंग सिस्टम सपोर्टसह येईल. नोकिया टी20 टॅबलेटचे वजन 465 ग्रॅम आहे. वायफाय ओन्ली व्हेरियंटचे वजन 470 ग्रॅम आहे. टॅबलेट T610 2*A75 1.8Ghz+6*A55 1.8Ghz सपोर्टसह येईल. कनेक्टिव्हिटीसाठी, नोकिया T20 टॅब्लेटमध्ये 3.5 मिमी ऑडिओ जॅक, यूएसबी टाइप-सी, हेडफोन जॅक, 3.5 मिमी स्टीरिओ ब्लूटूथ 5.0 सपोर्ट दिला आहे.

Nokia T20
नव्या रुपात येतेय Maruti Suzuki Alto; जाणून घ्या फीचर्स

बॅटरी

Nokia T20 मध्ये 8200mAh मजबूत बॅटरी देण्यात आली आहे. जी एकदा चार्ज केल्यास 15 तास वापरता येईल असा कंपनीचा दावा आहे. तसेच, 10 तास कॉलिंग साठी ती चालेल असेल. Nokia T20 ला 2K डिस्प्ले देण्यात येईल. तुम्हाला यात स्टिरिओ स्पीकर्स आणि ओझेओ प्लेबॅकसाठी सपोर्ट मिळेल. हा टॅबलेट ड्युअल मायक्रोफोनसह येते. याव्यतिरिक्त, जे वापरकर्ते Nokia T20 टॅबलेट खरेदी करतील त्यांना Spotify वर 70 मिलीयन ट्रॅक आणि 2.9 मिलीयन पॉडकास्टचा अॅक्सेस मिळेल.

Nokia T20
दिवाळीत मित्र-मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी पाच बेस्ट गॅजेट्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.