Nokia 5G Launch : नोकियाची धमाकेदार एन्ट्री! या 5G कीपॅड स्मार्टफोनची एक झलक तुम्हाला मोहून टाकेल; जाणून घ्या फीचर्स अन् आकर्षक किंमत

Mobile Launch Update : नोकियाने भारतात धमाकेदार एन्ट्री मारण्याची तयारी केली आहे.कंपनीने वर्षाच्या अखेरीस कीपॅडचा जबरदस्त 5G स्मार्टफोन लाँच केला आहे.
Nokia 7610 Pro Max 5G
Nokia 7610 Pro Max 5Gesakal
Updated on

Nokia : नोकियाने भारतात धमाकेदार एन्ट्री मारण्याची तयारी केली आहे. कंपनीने अलीकडेच Nokia 7610 Pro Max 5G हा जबरदस्त स्मार्टफोन लाँचची घोषणा केली आहे. 5G नेटवर्क असलेली, अत्याधुनिक फीचर्स आणि परवडणारी किंमत अशा तीनही गोष्टींची चाह असणाऱ्यांच्यासाठी हा फोन नक्कीच आकर्षक आहे. या फोनमध्ये नेमके काय विशेष आहे ते जाणून घेऊया

पहिली झलक तुम्हाला मोहून टाकेल

नोकिया 7610 प्रो मॅक्स 5G मध्ये मोठा आणि सुस्पष्ट टचस्क्रीन डिस्प्ले आहे. गेम खेळणे, व्हिडिओ पाहणे किंवा वेब ब्राउजिंग करणे या सर्व गोष्टी यावर अतिशय चांगल्याप्रकारे काम करता येतील. फोनची रिफ्रेश रेट देखील खूप चांगली आहे त्यामुळे डिस्प्लेवर सर्व काही खूप स्मूथ दिसते.

नोकिया 7610 प्रो मॅक्स 5G मध्ये अ नवीनतम Android 13 ऑपरेटिंग सिस्टम आहे. यासोबतच स्नॅपड्रॅगन 888 Plus हा दमदार प्रोसेसर आहे. यामुळे फोन अतिशय वेगाने आणि अडचणीशिवाय चालतो.

Nokia 7610 Pro Max 5G
Oneplus Nord 3 : एकदम स्वस्त अन् मस्त! OnePlus Nordची पुढची सिरीज लवकर होणार लाँच! ॲमेझॉनवर लाईव्ह सेल सुरू

कॅमेरा

नोकिया 7610 प्रो मॅक्स 5G च्या कॅमेऱ्याबद्दल अजून माहिती समोर आलेली नाही. पण, असा दावा केला जात आहे की, या फोनमध्ये 108 मेगापिक्सल आणि 48 मेगापिक्सल असे दोन दमदार कॅमेरे आहेत. तसेच सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा कॅμερα असण्याची शक्यता आहे. या जबरदस्त कॅमेरा सिस्टममुळे हाय क्वालिटी फोटो आणि सेल्फी घेणे शक्य होईल.

Nokia 7610 Pro Max 5G
Email Delete : ईमेल्सचा भडिमार झालाय? आता चिंता नाही, एका क्लिकवर डिलीट करा हवे तेवढे ईमेल,वापरा सोपी ट्रिक

बॅटरी आणि चार्जिंग

नोकिया 7610 प्रो मॅक्स 5G मध्ये 7200 mAh ची मोठी बॅटरी आहे. त्यामुळे फोनची बॅटरी बॅकअप खूपच चांगली आहे. म्हणजेच, एकदा चार्ज केल्यावर तुम्ही दिवसभर सहज वापरू शकतात. तसेच, Type C चार्जिंग सॉकेटमुळे फोन अतिशय वेगाने चार्ज होतो.

किंमत आणि उपलब्धता

नोकिया 7610 प्रो मॅक्स 5G ची किंमत अंदाजे 17999 रुपये असण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीने अजून अधिकृत किंमत जाहीर केलेली नाही. तसेच, हा फोन वर्षाच्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.