Not a Bot: 'X' लवकरच आणणार नवं 'सबस्क्रिप्शन मॉडेल'; युजरला लाईक्स-रिपोस्टसाठी द्यावे लागणार पैसे

या नव्या सबस्क्रिप्शन मॉडेलला 'नॉट अ बॉट' असं नाव दिलं गेलं आहे.
Not a Bot: 'X' लवकरच आणणार नवं 'सबस्क्रिप्शन मॉडेल'; युजरला लाईक्स-रिपोस्टसाठी द्यावे लागणार पैसे
Updated on

न्यूयॉर्क : ट्विटर अर्थात आत्ताचं एक्स या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर वर्षभरात अनेक महत्वाचे बदल झालेले आपण पाहिले असतील यानंतर आता पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे.

या बदलानुसार आता युजर्सना एक्सवरच्या पोस्ट लाईक आणि शेअर करता पैसे द्यावे लागणार आहेत. या नव्या सबस्क्रिप्शन मॉडेलला 'नॉट अ बॉट' असं नाव देण्यात आलं आहे. (Not a Bot X to Introduce New Subscription Model Soon User has to pay for likes reposts)

हे नवं सबस्क्रिप्शन मॉडेल सादर करताना बॉट्स आणि स्पॅमर्सशी मुकाबला करावा लागणार आहे. बॉट हा एलन मस्कसाठी एक वादग्रस्त मुद्दा राहिला आहे. या बॉटच्या माध्यमातून फेक अकाऊट्स बंद करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल उचललं जाणार आहे. (Latest Marathi News)

Not a Bot: 'X' लवकरच आणणार नवं 'सबस्क्रिप्शन मॉडेल'; युजरला लाईक्स-रिपोस्टसाठी द्यावे लागणार पैसे
क्रोम ब्राउझरला कंटाळलात? Privacy ची वाटते चिंता? मग आजच डाऊनलोड करा हे अॅप

किती शुल्क द्यावं लागणार?

प्रत्येक देशाच्या विनिमय दराच्या आधारे हे नवं सबस्क्रिप्शन शुल्क १ डॉलर इतकं निश्चित केलं जाणार आहे. नवं सबस्क्रिप्शन मॉडेल लागू झाल्यानंतर भारतातील युजर्सना यासाठी ८३.२३ रुपये द्यावे लागतील. याशिवाय चीनला ७.३० युआन, जपानला १४९.६८ येन, रशियाला ९७.५२ रुबल इतकं शुल्क द्यावं लागणार आहे. (Marathi Tajya Batmya)

Not a Bot: 'X' लवकरच आणणार नवं 'सबस्क्रिप्शन मॉडेल'; युजरला लाईक्स-रिपोस्टसाठी द्यावे लागणार पैसे
Electric Carच्या कमी रेंजची आहे चिंता, मग या टिप्स वापरून इलेक्ट्रिक कारची वाढेल रेंज

सर्वात आधी कुठे सुरु होणार

एक्सनं या नव्या सबस्क्रिप्शन मॉडेलबाबत सांगितलं की, "हे नवं मॉडेल सर्वात आधी न्यूझीलंड आणि फिलिपिन्समध्ये लागू होणार आहे. याची चाचणी करताना सध्याच्या युजर्सला त्याचा फटका बसणार नाही. पण जे नवे युजर्स सदस्यता घेऊ इच्छित नाहीत, ते केवळ पोस्ट किंवा व्हिडिओ पाहू शकतील तसेच अकाऊंट फॉलो करु शकतील"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()