Nothing Phone 1 खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्टवर आहे जबरदस्त ऑफर

या फोनचा प्री-ऑर्डर पास फ्लिपकार्टवर २०० रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. तुम्ही प्री-ऑर्डर पास खरेदी केल्यास तुम्हाला फोन खरेदी करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
Nothing Phone 1
Nothing Phone 1google
Updated on

मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी नथिंग लवकरच एक नवीन फोन बाजारात आणणार आहे. Nothing Phone 1 स्मार्टफोन 12 जुलै 2022 रोजी जागतिक स्तरावर लॉन्च केला जाईल. कंपनीचा भारतातील विशेष ऑनलाइन विक्री भागीदार Flipkartने फोनच्या प्री-बुकिंगवर अनेक ऑफर जाहीर केल्या आहेत.

Nothing Phone 1
what's appवर तुम्हाला कोणी ब्लॉक केले आहे का, हे कसे ओळखाल ?

या फोनचा प्री-ऑर्डर पास फ्लिपकार्टवर २०० रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. तुम्ही प्री-ऑर्डर पास खरेदी केल्यास तुम्हाला फोन खरेदी करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. पास खरेदी करण्यासाठी खर्च केलेली रक्कम फोनच्या किंमतीमध्येच समायोजित केली जाईल.

याशिवाय ग्राहकांनी स्मार्टफोन खरेदी करताना HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यास त्यांना अतिरिक्त सवलत दिली जाईल. त्याच वेळी, HDFC क्रेडिट कार्डद्वारे खरेदीदाराच्या फोनवर 2000 रुपयांपर्यंत सूट दिली जाईल.

Nothing Phone 1
BSNLच्या वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी ! हे फायदे होणार कमी...

भारतात नथिंग फोन 1 ची अपेक्षित किंमत :

ताज्या माहितीनुसार, नथिंग फोन 1 ची किंमत ३० हजार ते ३५ हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते. फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत जवळपास ३१ हजार रुपये असू शकते. त्याच वेळी, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत ३२ हजार असू शकते. याशिवाय 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत ३६ हजार रुपये असू शकते.

टीझर लॉन्चच्या वेळी, Nothing Phone 1 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन असल्याचे मानले जात होते. पण जेव्हा त्याचे फीचर्स समोर येतात तेव्हा ते फक्त मिड-रेंज डिव्हाईस असल्याचे दिसते. मात्र, फोन लॉन्च होईपर्यंत फोनची किंमत आणि फीचर्सबाबत काहीही सांगता येणार नाही.

नथिंग फोन १ मध्ये स्नॅपड्रॅगन ७७८+ प्रोसेसर दिला जाऊ शकतो. यात AMOLED डिस्प्लेसह 6.55 इंचाची स्क्रीन दिली जाऊ शकते. याशिवाय फोनमध्ये 120 Hz रिफ्रेश रेट मिळण्याची शक्यता आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि स्क्रीनच्या वर पंच-होल डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे.

फोनची बॅटरी 4500mAh असेल. हा फोन टाइप-सी पोर्टसह येईल जो 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. या फोनचा मागील कॅमेरा 50 मेगापिक्सेल आणि फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सेल असेल. फोनचा बॅक पॅनल पारदर्शक असण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.