Nothing Phone 2a Discount : नथिंग 2a स्मार्टफोन मिळतोय चक्क २५ हजारांपेक्षा कमी किंमतीत; कुठं सुरूय बंपर सेल? लगेच पाहा

Nothing 2a Smartphone Discount Price Amazon Sale : Nothing Phone 2a सध्या अमेझॉनवर मोठ्या डिस्काउंटवर मिळत आहे.
Nothing Phone 2a Discount offer
Nothing 2a Smartphone Discount Price Amazon Saleesakal
Updated on

Nothing Phone 2a Discount Offer : स्मार्टफोनच्या जगात आपल्या अनोख्या डिझाइनने वेगळं स्थान निर्माण करणारा Nothing Phone 2a सध्या अमेझॉनवर मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. जर तुम्ही Nothing चे फॅन असाल, तर हा तुमच्यासाठी फोन अपग्रेड करण्याचा सुवर्णसंधी आहे. अमेझॉनच्या सणासुदीच्या सेलमध्ये हा फोन तब्बल 11 टक्के सवलतीत मिळत आहे. विशेष म्हणजे 12GB रॅम असलेल्या व्हेरियंटवर तब्बल 18 टक्के सूट मिळत आहे.

Nothing Phone 2a हटके डिझाइन आणि प्रीमियम अनुभव

Nothing या कंपनीने कमी वेळातच आपल्या ट्रान्सपरंट डिझाइन आणि प्रीमियम फिचर्समुळे लोकप्रियता मिळवली आहे. Nothing Phone 2a चा खास पारदर्शक बॅक पॅनल आणि एलईडी लाईट्स हे फोनला खास स्टाइल देतात, ज्यामुळे डिझाइनप्रेमींसाठी हा फोन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो.

अमेझॉनच्या सणासुदीच्या ऑफरमध्ये Nothing Phone 2a वर विशेष सूट

अमेझॉनच्या सेलमध्ये Nothing Phone 2a या फोनची किंमत 27,999 रुपये होती, पण आता या सेलमध्ये 11 टक्के सवलत मिळत असून फोनची किंमत फक्त 24,890 रुपयांपर्यंत घसरली आहे. या सवलतीमुळे आता हा फोन घेण्यासाठी उत्तम वेळ आहे.

Nothing Phone 2a Discount offer
Laddu Mutya Baba: फिरता पंखा हातानं थांबवला अन् लड्डू मुत्त्या बाबाचं भांडं फुटलं; विज्ञानामुळं उलगडलं सत्य,व्हिडिओ पाहा

अतिरिक्त बँक आणि एक्सचेंज ऑफर

या सवलतीबरोबरच अमेझॉन बँक कार्ड्सवरही विशेष ऑफर्स देत आहे. निवडक बँक कार्ड वापरून खरेदी केल्यास तुम्हाला 1,250 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. तसेच, जुना फोन एक्सचेंज करून 23,250 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सवलत मिळवता येईल. मात्र, एक्सचेंजची अंतिम किंमत तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.

Nothing Phone 2a Discount offer
Meta AI Text to Video : तुमच्या शब्दांच्या कल्पनेने Meta AI बनवेल एकदम प्रोफेशनल व्हिडिओ, खास फीचर झाले लाँच,कसं वापराल? बघाच

Nothing Phone 2a फीचर्स

डिस्प्ले: 6.7-इंच AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1300 nits पीक ब्राइटनेससह मिळतो.

प्रोसेसर: MediaTek Dimensity 7200 Pro चिपसेट, ज्यामुळे अत्यंत वेगवान परफॉर्मन्स मिळतो.

रॅम आणि स्टोरेज: 8GB/12GB रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे.

कॅमेरा: 50MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.

बॅटरी: 5000mAh क्षमतेची बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळत आहे.

Nothing Phone 2a वर ही ऑफर फक्त मर्यादित काळासाठी आहे, त्यामुळे जास्त प्रतीक्षा न करता आजच तुमचा फोन अपग्रेड करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.