एकाच फोनमध्ये दोन WhatsApp वापरायचं? तर मग हे वाचा!

एकाच फोनमध्ये दोन WhatsApp वापरायचं? तर मग हे वाचा!
Updated on

नवी दिल्ली : सोशल मीडियापैकी एक असलेल्या WhatsApp चा वापर सध्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण एकाच स्मार्टफोनवर दोन WhatsApp वापरता येते, हे काहींना माहिती असेल तर काहींना कल्पनाही नसेल. पण आता WhatsApp कंपनी दोन WhatsApp वापरण्यासाठी नवे फिचर्स आणत आहे. मात्र, याला काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.

एकाच मोबाईलमध्ये दोन WhatsApp वापरण्याबाबत विचार केला जात आहे. सध्या यावर कंपनीकडून काम केले जात आहे. त्यानुसार आता याचे टेस्टिंगही सुरु आहे. मात्र, हे फिचर्स यायला आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. परंतु आता एकाच मोबाईलवर दोन WhatsApp कसे वापरायचे याची ट्रिक आता आम्ही सांगणार आहोत.

फोनमध्ये येतोय हा फिचर

शाओमी, सॅमसंग, विवो, ओप्पो, हुवावे आणि ऑनर या कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये Dual App किंवा Dual Mode सुरु करायला हवा. वेगवेगळ्या नावाने हे फिचर दिले जाते. त्याच्या माध्यमातून एकाच ऍपमधून दोन अकाऊंटस् वापरता येणार आहेत. ज्या फोनमध्ये हे ऍप नसेल ते WhatsApp Clone हे ऍप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येऊ शकते.

कोणत्या मोबाईलमध्ये कोणत्या नावाने

Xiaomi - स्मार्टफोनमध्ये Settings मध्ये गेल्यास Dual Apps हा ऑप्शन मिळेल. 

Samsung- सॅमसंग फोनमध्ये हे फीचर Dual Messenger नावाने असेल. फोनच्या की Settings मध्ये गेल्यानंतर Advance Feature ऑप्शनमध्ये जावे, तिथे हे फिचर मिळेल.

Oppo - ओप्पोच्या फोनमध्ये हे फीचर Clone Apps च्या नावाने दिले जाणार आहे. Settings मध्ये जाऊन हे Access करता येऊ शकते. 

Vivo - वीवोमध्ये हे फीचर App clone च्या नावाने मिळेल. Settings मध्ये गेल्यास वापरता येणार आहे. 

असे वापरा WhatsApp 

आपल्या मोबाईलमधील Dual App Setting सुरु करा

ज्या ऍपचे क्लोन बनवायचे आहे त्याला सिलेक्ट करा

प्रोसेसर पूर्ण होण्याची वाट पाहा.

आता आपल्या फोनवर WhatsApp Logo येईल. 

त्यानंतर दुसरा नंबरने लॉगिन करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()